adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आदिवासी कुटुंबातील मुलाचे कॅन्सर उपचारासाठी तातडीने उपलब्ध करून दिली शिधापत्रिका...

  आदिवासी कुटुंबातील मुलाचे कॅन्सर उपचारासाठी तातडीने उपलब्ध करून दिली शिधापत्रिका... चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) वेल्हे येथ...

 आदिवासी कुटुंबातील मुलाचे कॅन्सर उपचारासाठी तातडीने उपलब्ध करून दिली शिधापत्रिका...


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

वेल्हे येथील श्री शिवदास रामदास सोनवणे यांची कुटुंबातील मुलाला कॅन्सर असल्याचे निदान झाल्यानंतर संबंधितांना आर्थिक अडचणीमुळे उपचारासाठी शिधापत्रिका ची आवश्यकता होती ,मात्र ती त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांनी शनिवार सुट्टी असताना तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधला असता तहसीलदार भाऊसाहेब थोरात प्रभारी पुरवठा अधिकारी श्री योगेश पाटील व संगणक चालक श्री शशीकांत जमादार यांनी त्यांच्याकडून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन त्यांना ई शिधा पत्रिका वितरित केली...सदर ई शिधापत्रिका ही अन्नसुरक्षा योजनेसाठी पात्र असल्यामुळे त्या आधारे वैद्यकीय उपचार देखील घेणे शक्य होणार आहे... अधिकारी व कर्मचारी यांच्या तत्पुरतेमुळे संबंधित कुटुंबाचे कुटुंब प्रमुख व अन्य सदस्यांनी सहकार्याबद्दल प्रशासनाचे धन्यवाद व्यक्त केले आहेत...

प्रकरणातील मुलगी नंदिनीचे वय ११ वर्षे असून पुढील उपचारासाठी ती कुटुंबासह जळगावाला रवाना झाली आहे,

तेथील उपचार नंतर ती मुंबईला रवाना होणार आहे...

No comments