ई सेवा केंद्राच्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकार्यांना चौकशीचे आदेश जळगाव/भुसावळ प्रतिनिधी -:- (संपादक -:- हेमकांत गायकवाड) - नाशिक येथी...
ई सेवा केंद्राच्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकार्यांना चौकशीचे आदेश
जळगाव/भुसावळ प्रतिनिधी -:-
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
- नाशिक येथील राज्य सेवा हक्क आयुक्त चित्रा कुळकर्णी या जिल्हा दौर्यावर असतांना भुसावळ तालुक्यातील शासकिय कार्यालये तसेच ई सेवा केंद्र यासह इतर ठिकाणी फलक लावणे व कामकाजाबाबत आढावा बैठकीसाठी आलेल्या असतांना येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी भेट घेवून ई सेवा केंद्रावर नागरिकांच्या होणार्या फसवणूकीबाबत निवेदन दिले होते. या तक्रारीची दखल घेत कक्ष अधिकारी राज्यसेवा आयुक्त नाशिक उदय काण्णव यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र क्र. 0325/कावि-290/अपिल 407 अन्वये दि.25-3-25 रोजीच्या पत्रान्वये विषयांकित प्रकरणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ वामन सानप रा.हुडको कॉलनी यांना संदर्भीय तक्रार अर्जाची प्रत सह पत्रासोबत जोडली आहे. या प्रकरणी यथोचित कारवाई करून तक्रारदारास आपल्या कार्यालय स्तरावरून परस्पर कळविण्यात यावे असे पत्र कक्ष अधिकारी उदय काण्णव यांनी दिले आहे.

No comments