पिंपळे आश्रम शाळेला मिळाले (आय एस ओ)मानांकन अमळनेर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत असल...
पिंपळे आश्रम शाळेला मिळाले (आय एस ओ)मानांकन
अमळनेर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत असलेल्या अंमळनेर तालुक्यातील श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचालित सुकलाल अण्णा प्राथमिक व व यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा पिंपळे बु.या शाळेची आणखी एका प्रगतीकडे वाटचाल सूरु होती ती म्हणजे (आय एस ओ) नामांकन,शाळेची भौतिक सोयीसुविधा,प्रशासकीय कामकाज,शिस्त,गुणवंत्ता,विविध नावीन्यपूर्ण उपक्रम,या सर्वांचे बारकाईने परीक्षण झाले आणि अखेर गुडीपाडवा च्या शुभमुहूर्तावर शाळेला(आय एस ओ)प्रमाणपत्र जाहीर करण्यात आले,आश्रम शाळेला नामांकन मिळाल्याबद्दल पंचक्रोशितून अभिनंदनाचा वर्षाव होतं आहे,तसेच प्रकल्प अधिकारी अरुण पवार साहेब,स प्र अधिकारी पवनकुमार पाटील,संस्थेचे अध्यक्षा विद्याताई पाटील,सचिव नानासाहेब युवराज पाटील,ऍड अभिजित पाटील यांनी प्राथमिक मुख्याध्यापक अविनाश अहिरे,माध्यमिक मुख्याध्यापक उदय पाटील,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांचेसह संपूर्ण टीम चे अभिनंदन व कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत

No comments