बौद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यामध्ये देण्यासाठी भव्य मोर्चा भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दि...
बौद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यामध्ये देण्यासाठी भव्य मोर्चा
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दिनांक 11/एप्रिल 2025 वार शुक्रवार रोजी यावल येथील बौद्ध समाजाच्या वतीने बोरावल गेट डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळून सकाळी बारा वाजता दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभे चे सर्व उपासक उपासिका सर्वपक्षीय कार्यकर्ता एकजूट होऊन प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मोर्चा सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या प्रसंगी भन्तेजी भोजपुरी येथील शिक्षक श्री महाले सर यांनी प्रस्तावना केली काँग्रेस पक्षाचे एसी सेलचे तालुका अध्यक्ष अनिल भाऊ जंजाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच फैजपूर येथील भीम आर्मी महाराष्ट्र प्रवक्ता व कार्यकर्ता रमाकांत तायडे यांनी बिहारमध्ये बौद्धगया महाबोधी महाविहार येथे बौद्ध भिकू यांच्यावरती कार्यवाही केलेली आहे तसेच त्यांचे गुन्हे मागे घेण्यात यावे व बौद्धगया येथील महाभूती महाविहार बौद्धांच्या ताब्यामध्ये देण्यात यावे अशा प्रकारे घोषणा देऊन मोर्चा तहसीलदार श्री मोहनमाला नाझीरकर यांना निवेदन देण्यात आले यावल तालुक्यातील व फैजपूर येथील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांचा पूर्णपणे पाठिंबा दिला आहे निळे निशाण सामाजिक संघटनेचे महिला यावल रावेर विभागीय अध्यक्ष लक्ष्मीताई मेढे सावता येथील माजी नगराध्यक्ष नंदाताई लोखंडे माजी नगरसेवक विजय गजरे अविनाश तायडे दीपक अडकमोल अविनाश भास्कर डॉक्टर विवेक अडकमोल सागर गजरे सचिन कोळी स्वप्निल गजरे भूषण कोळी प्रमोद पारदे किरण तायडे अनिल इंधाटे मिलिंद जंजाळे अशोक तायडे इंजिनियर अविनाश अडकमोल मिलिंद तायडे सुपडू संदनशिव भीम आर्मी यावल तालुका अध्यक्ष आकाश बिराडे अरुण गजरे विकी गजरे चंद्रकांत गजरे पंकज तायडे मंगला अडायगे हिराबाई शिरसाट कलाबाई गायकवाड आशाबाई भालेराव सोनम गजरे प्रदीप गजरे असे नागेद्र साळवे मिलिंद सोनवणे रॉकी गजरे आदि कार्यकर्ता उपस्थित होते तहसीलदार यांना निवेदन देतेवेळी भन्तेजी यांनी निवेदनावर लिहिलेला मजकूर वाचून दाखविला व ही मागणी पूर्ण न झाल्यास पुढेही असे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सर्व बौद्ध समाज बांधव यांनी दिला

No comments