सहकार भारती तर्फे राष्ट्रीय डेअरी अधिवेशनाचे आयोजन जिल्हाध्यक्ष :-नरेंद्र नारखेडे चेअरमन नरेंद्र नारखेडे इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- ...
सहकार भारती तर्फे राष्ट्रीय डेअरी अधिवेशनाचे आयोजन जिल्हाध्यक्ष :-नरेंद्र नारखेडे
![]() |
| चेअरमन नरेंद्र नारखेडे |
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर सहकार भारती चे वतीने संपुर्ण देशातील दूध उत्पादक सहकारी संस्था चे राष्ट्रीय डेअरी अधिवेशन दि 24 व 25 मे याकाळात गुजरात राज्यात आनंद येथे आयोजन केले असल्याची माहिती सहकार भारती जळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष नरेंद्र विष्णू नारखेडे यांनी दिली
विना सहकार ।नाही उद्धार विना संस्कार ।नाही सहकार हे ब्रीद घेऊन सहकार क्षेत्राचे विकासासाठी व सुसंस्कृत कार्यकर्ता निर्माण होणेसाठी व सहकार क्षेत्रातील समस्यांचे निराकरण होण्यासाठी देशभर सहकार भारतीचे कार्य सुरू आहे या कार्याचा भाग म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था चे राष्ट्रीय पातळीवर अधिवेशन आयोजित करीत असते यांपैकी सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या दूध उत्पादक सहकारी संस्थांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी व चर्चा होऊन योग्य मार्गदर्शन या अधिवेशनात होणार आहे अधिवेशनात देशपातळीवर काम करणारे तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे या अधिवेशन करिता जिल्हा दूध उत्पादक संघाचे पदाधिकारी व संचालक कर्मचारी प्रतिनिधी व गावपातळीवर कार्यरत असणाऱ्या दूध उत्पादक सहकारी संस्थाचे पदाधिकारी व संचालक मंडळ प्रतिनिधी व कर्मचारी प्रतिनिधी उपस्थित राहणे अपेक्षित आहे याबाबत जिल्हा सहकार भारती ची सभा जिल्हा अध्यक्ष नरेंद्र नारखेडे व जळगाव महानगर जिल्हा अध्यक्ष शोभाताई पाटील यांचे उपस्थित मध्ये संपन्न होऊन सभेस राष्ट्रीय संघटन प्रमुख दिलीप रामू पाटील व महिला राष्ट्रीय प्रमुख सौ रेवती शेंदूरणीकर यांनी मार्गदर्शन केले व राष्ट्रीय डेअरी अधिवेशनात जळगाव जिल्ह्यातून जास्तीत जास्त प्रतिनिधी पाठवावे असे ठरले सभा सुत्रसंचालन महामंत्री शशिकांत बेहडे यांनी केले राष्ट्रीय डेअरी अधिवेशनास जळगाव जिल्ह्यातील दूध डेअरी संचालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष डा उदय राव जोशी व राष्ट्रीय महामंत्री दिलीप चौरसिया यांचे वतीनेसहकार भारती जिल्हा अध्यक्ष नरेंद्र नारखेडे शोभाताई पाटील प्रदेश सदस्य चंद्रहास भाई गुजराथी नेमीचंद जैन जिल्हा उपाध्यक्ष सुधीर आबा पाटील चाळीसगाव प्रवीण कुडे शांताराम पाटील सौ मनीषा खडके सचिव विकास देवकर प्रमोद नगरकर सुरेखा पाटील जीवन राऊळ धनंजय फिरके व सहकार भारती जिल्हा कार्यकारिणी यांनी केले आहे.

No comments