भारतीय जनता पार्टी जयराम भुसारे यांची हरसुल मंडळ अध्यक्षपदी निवड त्र्यंबकेश्वर हरसुल मंडळ अध्यक्ष निवड संपन्न प्रतिनिधी -जयवंत हागोटे त्र...
भारतीय जनता पार्टी जयराम भुसारे यांची हरसुल मंडळ अध्यक्षपदी निवड
त्र्यंबकेश्वर हरसुल मंडळ अध्यक्ष निवड संपन्न
प्रतिनिधी -जयवंत हागोटे त्रंबकेश्वर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या अंतर्गत अध्यक्षकांच्या निवड प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, दि.२० एप्रिल २०२५ (वार: रविवार)भारतीय जनता पार्टीच्या त्र्यंबकेश्वर हरसुल मंडळ अध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया आज उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.या निवड प्रक्रियेत जयराम भुसारे यांची एकमताने मंडळ अध्यक्षपदी निवड करण्यात आली.ही निवडणूक भाजपा नाशिक दक्षिण जिल्हा निवडणूक अधिकारी गिरीश रामचंद्र पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली,तसेच निवडणूक प्रभारी भाऊसाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी,बुथ प्रमुख,लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रमुख उपस्थितांमध्ये पवन बोरसे, हिरामण गावित,हनुमंत तरवारे,अशोक भोये,सतिश दुसाने,लता राऊत,कौसल्या लहारे,गोकुळ गारे,कांतीलाल सेठ लोखंडे,रामदास बोरसे,सुमित्रा वड,देवका कुंभार,धनराज खेडुलकर,भरत बोरसे,नवनाथ बदादे, मुरलीधर बोरसे,अशोक कुंभार,लक्ष्मण भांगरे,वसंत कापसे,अमोल जाधव व पियुष लहारे यांचा समावेश होता.
याच कार्यक्रमात भाऊराव खरपडे यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला.त्यांच्या प्रवेशामुळे पक्ष संघटना अधिक बळकट होणार आहे, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.नवीन मंडळ अध्यक्ष जयराम भुसारे यांनी निवडीनंतर बोलताना सर्व सहकाऱ्यांचे व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले व मंडळ स्तरावर पक्षवाढीसाठी निष्ठेने काम करण्याचा संकल्प केला.

No comments