अनोख्या चित्रकारांची , अनोख्या पद्धतीने अभिवादन...! " किती शोभला असता भिम नोटावर,टाय...
अनोख्या चित्रकारांची , अनोख्या पद्धतीने अभिवादन...! " किती शोभला असता भिम नोटावर,टाय अन कोटावर "
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मानव सेवा विद्यालयाचे कलाशिक्षक, उपक्रमशील शिक्षक, चित्रकार सुनिल दाभाडे यांनी दहा रुपयाच्या नोट वर कलर पेन्सिल च्या साहाय्याने डॉ.बाबासाहेबांचे चित्र रेखाटून जयंती निमित्त अनोख्या पध्दतीने मान वंदना केले.
१४ एप्रिल २०२५ आपल्या पेनाच्या ताकदीवर न्याय ,समता,बंधुता मिळवून देणारा ,सर्वाना शिकण्याचा हक्क आणि न्याय मिळवण्याची ताकद देऊन गुलामगिरीच्या अंधारातून उज्वल प्रकाश दाखविणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती.
गरीब,दीन ,दलित,पीडित,खचलेल्या समाजातील सर्वांच्या जीवनात आपल्या शिक्षण व बुद्धीच्या जोरावर ज्यांनी ऐश्वर्य आणलं,त्या बाबासाहेबांची प्रतिमा चलनी नोटांवर किती शोभून दिसेल या कल्पनेतून कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांनी कलर पेन्सिलने दहा रुपयाच्या नोट वर हे चित्र साकारून बाबासाहेबांना जयंती निमित्त अनोखे अभिवादन केले आहे. हे चित्र तयार करण्यासाठी 14 मिनिट लागले आहे. आधी ही ज्वारीचा भाकरीवर पिंपळाचा पानावर तसेच 1111 शब्दापासून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चे सुरेख चित्र रेखाटले होते. यांची नोद वर्ल्ड रेकॉर्ड, लंडन व ओ.एम.जी नॅशनल बुक आफ रेकॉर्ड मध्ये सुनिल दाभाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सुंरेख चित्राची नोंद झाली आहे.

No comments