adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मुलीच्या लग्नाच्या पाच दिवस आधीच वडील CISF जवानाचा मृत्यू शासकीय इतमामात झालेअंत्यसंस्कार

  मुलीच्या लग्नाच्या पाच दिवस आधीच वडील CISF जवानाचा मृत्यू शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार  रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकां...

 मुलीच्या लग्नाच्या पाच दिवस आधीच वडील CISF जवानाचा मृत्यू

शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार 




रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मोठा वाघोदा येथील सी.आय एस एफ जवान बुधो कचरे त्यांच्या मुलीचे लग्न  सात दिवसांनी व्हायचे होते पण बुधो कचरे या  सैन्य दलातील जवानाचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला.  त्यांच्या निधनाने मोठा वाघोदा गावात शोककळा पसरली आहे. स्वर्गीय सैनिक स्व बुधो राजाराम कचरे (धनगर)यांचे पार्थिव  फुलांनी सजवलेल्या स्वर्ग रथाने निघालेल्या अंतिम यात्रेत असंख्य संख्येने नागरिक उपस्थित होते 


निंभोरा रस्त्यावरील स्मशानभूमीत रविवारी बुधो कचरे धनगर यांच्या पार्थिवावर  राष्ट्रभक्तीपर गीत व सलामी मानवंदना देण्यात आली व शासकीय इतमामात सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महसूल प्रशासन परिमंडळाचे अमोल चौधरी, सावदा पोलीस स्टेशनचे एपीआय विशाल पाटील पोलीस कर्मचारी व सीआरपीएफ तुकडीचा ताफा उपस्थित होता. CISF मुंबईचे उपनिरीक्षक बुधो कचरे (56) यांचे अल्पशा आजाराने 12 रोजी निधन झाले. बुधो कचरे यांच्या मुलीचे 19 एप्रिल रोजी लग्न असल्याने कचरे हे दोन दिवसांपूर्वी त्यांच्या मूळ गावी आले होते. दोन दिवसांपूर्वी बुधो कचरे आपली, देशसेवेसोबतच घरची जबाबदारी असलेल्या जवानाच्या निधनाने मोठा वाघोदा गावात शोककळा पसरली होती. 5 दिवसांवर आलेल्या 

मुलीच्या लग्न समारंभाच्या आयोजनासाठी ते त्यांच्या मूळ गावी मोठा वाघोदा येथे आले होते. अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना भुसावळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे उपचार न झाल्याने त्यांना मुंबईला हलवण्यात आले. मात्र वाटेत अडचणी वाढत गेल्याने त्यांना नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली त्त्यांनी जवळपास 35 वर्षे देशाची सैनिकी सेवा केली. या 35 वर्षात त्यांनी 22 राज्यात सेवा बजावली.

No comments