यावल येथील खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी पांडुरंग सराफ तर व्हाचेअरमन पदी अतुल भालेराव यांची निवड भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -...
यावल येथील खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी पांडुरंग सराफ तर व्हाचेअरमन पदी अतुल भालेराव यांची निवड
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या संचालकाची बैठक दिनांक आठ एप्रिल रोजी संपन्न झाली यात चेअरमन व व्हाचेअरमन यांची बिनविरोध निवड करण्यात आली यात फैजपूर येथील माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांची चेअरमन पदी निवड करण्यात आली तर व्हाचेअरमन पदी अतुल भालेराव यांची निवड करण्यात आली यावेळेस त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळेस संघाचे माजी चेअरमन नरेंद्र नारखेडे, संचालक अनंत नेहेते, चंद्रशेखर चौधरी, संदीप भारंबे यांच्या सह संस्थेचे संचालक मंडळ व कर्मचारी हजर होते दोघांचे निवडीबद्दल तालुक्यात त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

No comments