बौध्दजन ग्रामस्थ मंडळ पानवे मुंबई या मंडळाची कार्यकारणी समिती गठित शामसुंदर सोनवणे वि.प्र. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) म्हसळा:- सार्वजनि...
बौध्दजन ग्रामस्थ मंडळ पानवे मुंबई या मंडळाची कार्यकारणी समिती गठित
शामसुंदर सोनवणे वि.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
म्हसळा:- सार्वजनिक अध्यक्ष पदाची निवडणूक प्रकिया नुकतीच शनिवार दि. 23मार्च 2025 रोजी हॉरनिमल सर्कल,फोर्ट मुंबई येथे पार पडली मुंबई मंडळाचे मावळते अध्यक्ष आयु. दिनेशजी तांबे यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्या नंतर त्यांच्या जागी बौद्धजन ग्रामस्थ मंडळ पानवे मुंबई मंडळाच्या उपस्थित सभासदांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आखून दिलेल्या लोकशाही मार्गाने निवडणूक प्रक्रिया राबवून आयु.विजय शंकर तांबे यांची बहुमताने अध्यक्ष पदी निवड करण्यात आली मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आयु विजय तांबे यांनी आपल्या अध्यक्ष पदाची जबाबदारी स्विकारून 6 एप्रिल रोजी सोसिअल सर्विस लीग हायस्कूल,परेल मुंबई येथे मंडळाची जाहीर सभा घेऊन आपल्या सहकार्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.यामध्ये मंडळाच्या उपाध्यक्षपदी आयु.रवींद्र तांबे, काशिनाथ खैरे, विकास तांबे, सचिव पदी संतोष खैरे, प्रणेश तांबे, विशाल तांबे व आदित्य तांबे, तर खजिनदार वैभव तांबे,संतोष ज.तांबे,कार्याध्यक्ष म्हणून पानवे गावची धडाडीची तोफ मधुकर तांबे, सुदर्शन तांबे,अजय तांबे प्रमुख संघटक म्हणून प्रमोद तांबे,विनायक तांबे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली मंडळाच्या सल्लागार पदी दिनेश तांबे,सुदेश खैरे,दिपक तांबे,तालुका प्रतिनिधी म्हणून धर्मेंद्र मोहिते यांची निवड करण्यात आली मा.अध्यक्ष विजय तांबे,सचिव संतोष खैरे यांनी उपस्थित सभासद बांधवांचे आभार मानून सभेची सांगता केली.

No comments