कोल्हे हिल्स परिसर सिद्धिविनायक चौकात अज्ञान गुंडांनी चायनीज गाडी पलटी करून केलें नुकसान नुकसानग्रस्त चायनीज गाडी सह गाडीचे मालक जळगाव प्...
कोल्हे हिल्स परिसर सिद्धिविनायक चौकात अज्ञान गुंडांनी चायनीज गाडी पलटी करून केलें नुकसान
![]() |
| नुकसानग्रस्त चायनीज गाडी सह गाडीचे मालक |
जळगाव शहरातील वाढत्या गुंडगिरीला काढण्यासाठी पोलिसांची कसरत सुरू असून सुद्धा गुंड हे ऐकायला तयार नाहीत तसाच एक प्रकार जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसर जवळ सिद्धिविनायक चौकात अज्ञान गुंडांनी एका गरीब नागरिकाची चायनीज गाडी जे नुकसान करून पलटी क रून दिली.
आमचे प्रतिनिधी यांनी चायनीज गाडी मालकास विचारले असता त्यांनी सांगितले की हे गुंड हे जवळचे आहेत त्यांना कोणताही धाक नाही तसेच त्यांना पोलिसांनी पकडले सुद्धा होते परंतु काही जणांनी ओळख दाखवल्याने पोलिसांनी त्यांना सोडून दिले असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे
परंतु पोलिसांचा धाक गुंडांना राहिलेला नाही, सिद्धिविनायक चौकात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहे, दारू सट्टा पत्ता गुटखा याचे प्रमाण वाढताना दिसत आहे, दरम्यान स्थानिक नागरिकांनी पोलीस स्टेशनला वारंवार तक्रार करून सुद्धा तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी कोणतेही कारवाई करण्यास तयार नाही असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे,
थोड्या दिवसापूर्वी लहान बाळांना शिकवण्यासाठी डान्स क्लासेस त्या ठिकाणी सुरू झाले होते, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे पण लावण्यात आले होते, परंतु अज्ञान गुंडांनी सुद्धा ते सीसीटीव्ही कॅमेरे फोडून त्या ठिकाणातील डान्स क्लासेस बंद करण्यात भाग पाडले. असे असताना सुद्धा तालुका पोलीस स्टेशन कारवाई का करत नाही अशी चर्चा स्थानिक नागरिकांन कडून होत आहे

No comments