डांभुर्णी शिवारात बिबट्याने दोन वर्षीय बालिकेला केले फस्त... बालिकेच्या नातेवाईकांचा आक्रोश ... चोपड़ा (प्रतिनिधि) -- (संपादक -:- हेमकांत ग...
डांभुर्णी शिवारात बिबट्याने दोन वर्षीय बालिकेला केले फस्त...
बालिकेच्या नातेवाईकांचा आक्रोश ...
चोपड़ा (प्रतिनिधि) --
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात बिबट्याने लहान दोन वर्षीय बालिकेवर हल्ला करून फस्त केले गेल्या दिड महिन्यातील ही दुसरी घटना आहे आज रात्री 1 वाजेच्या सुमारास डांभुर्णी ता यावल शिवारामध्ये असलेल्या प्रभाकर चौधरी यांच्या शेतात ठेलारी समाजातील मेंढपाळांची मुलगी नामे रत्नाबाई सतिश रुपनर. वय 2 वर्षे असलेल्या मुलीला बिबट्या उचलून घेऊन गेलेला आहे. वनविभागाने बिबट्या याचा त्वरित पिंजरे लावून बंदोबस्त करावा तसेच बिबट्या पकडण्यासाठी विशेष प्रशिक्षीत पथकाची नेमणुक करावी अशा सूचना आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी यावेळी घटनास्थळी भेट दिली त्यावेळी सूचना दिल्या जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून सदर घटनेबाबत अवगत केले याप्रसंगी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील, यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्यासह परिसरातील शेतकरी तसेच अनेकजन उपस्थित होते यावेळी सदर आपदग्रस्त कुटुंबीयांना म्हणजेच मयताच्या वारसांना तात्काळ आपण भरीव मदत उपलब्ध करून देऊ असे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितले तर वनविभागाने त्वरित याचा प्रस्ताव तयार करावा अशी सूचना दिल्या यावेळी वनविभागाचे सर्वच अधिकारी हजर होते. यावेळी बालिकेच्या नातेवाईकांनी एकच टाहो फोडला होता. यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी गावकऱ्यांना देखील आवाहन केले की, बिबटया पिंजऱ्यात येत नाही तो पर्यंत गावकऱ्यांनी आपले स्वतःचे संरक्षण स्वतः करावे आणि जागृत राहावे.

No comments