धरणगाव येथील अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या सोनल पाटील राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित विकास पाटील धरण...
धरणगाव येथील अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या सोनल पाटील राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित
विकास पाटील धरणगाव
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
धरणगाव : येथील सामाजिक कार्यकर्त्या तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या महिला जिल्हाध्यक्ष व आदिती ड्युटी अँड ॲकॅडमी संचालिका सोनल पाटील यांचे जळगाव येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने जळगाव येथील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या उपस्थितीत विशेष राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सोनल ताई पाटील यांची सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांनी आतापर्यंत गोरगरीब जनतेच्या शेतकऱ्यांच्या व महिलांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्परतेने त् कार्य केले आहे. सोनलताई पाटील यांनी व्यवसाय करताना सामाजिक कार्य देखील जोपासले आहे ते नेहमी सामाजिक कार्यात गोरगरीब जनतेच्या समस्या वरी अडचणी सोडवण्यास नेहमी तत्पर असतात. त्यांच्या यादी अनेक आंदोलनात सहभाग होता. त्यांनी केलेला सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.
सोनल पाटील यांचे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अखिल भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा पाटील खंडापुरकर, महिला प्रदेशध्यक्षा राणीताई स्वामी निवड समिती अध्यक्ष, अनिल दादा देसले, जळगाव जिल्हाध्यक्ष महेश पाटील, महिला उपाध्यक्षा गूंजन ताई, युवा जिल्हाध्यक्ष गिरीष पाटील, धरणगाव तालुका अध्यक्ष विकास पाटील, विभागीय अध्यक्ष राहूल पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष समाधान पाटील, जळगाव शहर अध्यक्ष निलेश बाविस्कर, अमळनेर महिला तालुका अध्यक्षा राजश्री पाटील व महाराष्ट्र भरातून संघटनेचे पदाधिकारी व सामाजिक व राजकीय क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

No comments