आगामी सण उत्सव सर्वसमावेशक व गुण्यागोविंदाने साजरे करा - पीआय डॉ विशाल जयस्वाल रावेर पोलीस, महसूल न.पा.तर्फे शांतता समितीची बैठक संपन्न र...
आगामी सण उत्सव सर्वसमावेशक व गुण्यागोविंदाने साजरे करा - पीआय डॉ विशाल जयस्वाल
रावेर पोलीस, महसूल न.पा.तर्फे शांतता समितीची बैठक संपन्न
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आगामी काळात श्री राम नवमी, परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती , हनुमान जयंती या महापुरुषांच्या जयंती व आगामी काळात उत्सव साजरे केले जाणारे सण उत्सव सर्वधर्मसमभावाने तसेच सर्वसमावेशक आणि गुण्यागोविंदाने सर्व धार्मियांनी जातीय सलोखा अबाधित राखून सहभागी होऊन उत्साहात साजरे करण्याचे आवाहन रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांनी रावेर पोलीस स्टेशनमध्ये आयोजित महसूल,पोलीस, नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीत आवाहन आले.
रावेर पोलीस स्टेशनमध्ये आयोजित शांतता समितीच्या बैठकीत रावेर चे तहसीलदार बंडू कापसे, मुख्याधिकारी अभिजित कदम, पोलीस निरीक्षक
डॉ विशाल जयस्वाल, यावेळी उपस्थित मान्यवर यांना तहसीलदार बंडू कापसे यांनी मार्गदर्शन केले बैठकीत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, डॉ सुरेश पाटील, माजी नगराध्यक्ष हरीश गणवानी, दिलीप कांबळे, ऍड योगेश गजरे, सी एस पाटील, शे गयास, अरुण शिंदे, विजय लोहार, नितीन पाटील, लक्ष्मीकांत लोहार, संतोष पाटील, शैलेश अग्रवाल असदुल्ला खान, पी.के.महाजन, पंकज वाघ, डी,डी वाणी उमेश महाजन, दीपक नगरे शालिक महाजन, सुधाकर महाजन, शे कौशर, सोपान पाटील, युसूफखान इब्राहिम खा अभिजित लोणारी, अय्युब पहेलवान, अ रफिक, पोलीस पाटील

No comments