adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एलसीबी,राज्य उत्पादन शुल्क, नगर तालुका पोलीस यांची संयुक्त कारवाई..विदेशी दारू..१ कोटी ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

  एलसीबी,राज्य उत्पादन शुल्क, नगर तालुका पोलीस यांची संयुक्त कारवाई.. विदेशी दारू..१ कोटी ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त  सचिन मोकळं अहिल्यानगर (...

 एलसीबी,राज्य उत्पादन शुल्क, नगर तालुका पोलीस यांची संयुक्त कारवाई..

विदेशी दारू..१ कोटी ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 अहिल्यानगर (दि.४):-गोवा राज्यातून अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध दारू वाहतूक करणारा कंटेनर दौंड रोडवरील नगर तालुक्यात खडकी शिवारातून  दि.४ एप्रिल रोजी ताब्यात घेतला आहे.राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक सोनोने तसेच पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना मिळालेल्या माहितीनुसार गोवा राज्यातून अवैध दारू वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने अहिल्यानगर तालुक्यातील खडकी शिवारात सापळा रचून अवैध दारू वाहतूक करणारा कंटेनर ताब्यात घेतला.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क तसेच स्थानिक गुन्हे शाखा व तालुका पोलिसांनी केली. या कारवाईत एक कोटी ५१ लाख ९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 

 ही कारवाई वाडेकर राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक घुगे, दुय्यम निरीक्षक कुसळे,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर,तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते,सागर मिसाळ,गणेश धोत्रे,अरुण गांगर्डे,शाहिद शेख यांच्या पथकाने केली.अधिक तपास दुय्यम निरीक्षक रुपेश चव्हाण हे करीत आहे.

No comments