adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मसाका ते फैजपूर रस्त्यावर वाढलेली झुडपे काढावी - नागरिकांची मागणी

  मसाका ते फैजपूर रस्त्यावर  वाढलेली झुडपे काढावी - नागरिकांची मागणी  इदू पिंजारी फैजपूर - (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मधुकर सहकारी साखर का...

 मसाका ते फैजपूर रस्त्यावर  वाढलेली झुडपे काढावी - नागरिकांची मागणी 


इदू पिंजारी फैजपूर -

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मधुकर सहकारी साखर कारखाना ते फैजपुर रस्त्यावरील वळणावर बऱ्याच ठिकाणी काटेरी झुडपे वाढलेली आहेत. या काटेरी झुडपांमुळे  अपघाताचा धोका वाढला असून संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वाढलेले झुडपे काढण्यात यावी अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.

        याबद्दल सविस्तर माहिती अशी की  मधुकर सहकारी साखर  कारखान्या पासून फैजपूर पर्यंत तीन किलोमीटर  रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाटलेली आहेत. पावसाळा संपला परंतु हे काटेरी झुडपे काढण्यास संबंधित विभागाला अजूनही जाग नाही. अनेकदा वाहनधारकांना या झाडाच्या फांद्या लागून अपघात होत  असल्याचे प्रकार वाढले आहेत.ज्यावेळी दोघी बाजूने समोरासमोरील ट्रक किंवा महामंडळाच्या एस टी बस येतात त्या वेळेला असा प्रसंग निर्माण होत असतो. अशावेळी पुढे काही मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.याकडे मात्र संबंधित विभागाकडून पूर्णपणे  दुर्लक्ष होतांना दिसत आहे . रस्त्यावर समोरून येणारे वाहन या झुडपांमुळे दिसत नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या जेष्ठ नागरिकांना सुद्धा या गोष्टीचा त्रास सहन करावा लागत असतो.यासाठी संबंधित विभागाने लक्ष देऊन ही रस्त्यात आलेली झुडपे काढण्यात यावीत अशी मागणी वाहन धारकांकडून  व ज्येष्ठ नागरिकांकडून केली जात आहे.

No comments