चोपडा आगारातुन नांदुरीगड यात्रोत्सव साठी जादा बसेस चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा (दि.५) - नांदुरीगड येथे सप्तश्रृंगी...
चोपडा आगारातुन नांदुरीगड यात्रोत्सव साठी जादा बसेस
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा (दि.५) - नांदुरीगड येथे सप्तश्रृंगी मातेच्या यात्रोत्सवा साठी गडावर जाणार्या भाविकांसाठी राज्य परीवहन महामंडळाच्या चोपडा आगारातर्फे दिनांक ५ एप्रिल रोजी आगार प्रमुख महेंद्र पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन जादा बसेस सोडण्यात आल्या पहील्याच दिवशी प्रवाश्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.५ एप्रिल ते १५ एप्रिल दरम्यान नांदुरी गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत .तसेच ज्या गावातुन थेट गडावर जाणारे ४४ प्रवाशी असतील त्या गावातून थेट जादा बस उपलब्ध करुन देण्यात येईल.चोपडा ते नांदुरीगड प्रौढ भाडे ३७३ रु. व हाफ भाडे १८६ रु. (जेष्ठ नागरिक व महिला प्रवाशी) एवढे असुन चोपडा आगारातर्फे सोडण्यात येणार्या जादा बसेसचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी केले आहे.

No comments