न.प.मुख्याधिकाऱ्यांच्या गाडीवर काळे ऑईल फेकून झालेल्या नुकसानाची प्रहारने केली गोरगरिबांना अन्नदान देऊन भरपाई अमोल बावस्कार बुलढाणा (संपाद...
न.प.मुख्याधिकाऱ्यांच्या गाडीवर काळे ऑईल फेकून झालेल्या नुकसानाची प्रहारने केली गोरगरिबांना अन्नदान देऊन भरपाई
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- शहरातील आरोग्यम् हॉस्पीटलच्या अवैध बांधकामा विरोधात तक्रार देवूनही व प्रभारी मुख्याधिकारी डॉ.प्रशांत शेळके यांनी संबंधित बांधकाम धारकास एक महिन्याच्या आत सदर बांधकाम जमिनदोस्त करण्यात यावे अन्यथा आपणाविरूध्द फौजदारी कारवाई करण्याची नोटीस बजावली. त्यानंतर वेळकाढू धोरण गत् ३ महिन्यांपासून अवलंबण्यात आले. त्या विरोधात न.प.मुख्याधिकार्यांच्या गाडीवर काळे ऑईल फेकून त्यांच्या कारभाराचा निषेध नोंदविल्यानंतर मुख्याधिकार्यांनी मलकापूर शहर पो.स्टे. तक्रार देवून त्यामध्ये ३०० रूपयांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात शहरातील गोरगरीबांना खिचडी, मठ्ठा व लाडू वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा उपप्रमुख अजय टप, वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब दामोधर, प्रहारचे तालुका प्रमुख अजित फुंदे, शहर प्रमुख शालीकराम पाटील, शहर युवा अध्यक्ष उमेश जाधव, बलराम बावस्कार, बंडूभाऊ वाघमारे, किशोर पानट, करण शिरसवाल, नवलसिंग शिंदे, राजवर्धन जाधव, रणवीर जाधव यांचेसह आदी उपस्थित होते.

No comments