शिर्डी बसस्थानक परिसरात प्रवासी म्हणून आलेल्या इसमास भिक्षेकरी समजून पोलिस व नगरपंचायत यांच्या संयुक्त कार्यवाहीत पकडले... पाण्याविना चार...
शिर्डी बसस्थानक परिसरात प्रवासी म्हणून आलेल्या इसमास भिक्षेकरी समजून पोलिस व नगरपंचायत यांच्या संयुक्त कार्यवाहीत पकडले...
पाण्याविना चार जण दगावले ? नातेवाईकांचा आरोप
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :- शिर्डी बसस्थानक परिसरात प्रवासी म्हणून आलेल्या इसमास पोलिसांनी व नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी भिक्षेकरू समजून त्याला ताब्यात घेऊन विसापूर येथे नेण्यात आले व तसेच त्याच्यासह इतर तीन ते चार जणांना दोरीने बांधण्यात आले.यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी आक्रोश करत सिव्हिल हॉस्पिटल येथे संतप्त प्रतिक्रिया दिली की, सिव्हिल हॉस्पिटल व विसापूर येथे झालेल्या मारहाणीत हे तीन ते चार इसम दगावलेले आहे.व यांचे दोरीने हात व पाय बांधण्यात आले होते यांना जेवण व पाणी सुद्धा पिण्यासाठी देण्यात येत नव्हते त्यांच्या हाता पायावर दोरीने बांधलेले तुकडे अजूनही तसेच आहे.यात त्यांचा मृत्यू झाला आहे असे मत मृतांच्या नातेवाईकांनी व्यक्त केले आहे.

No comments