adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महिला ग्राम महसूल अधिकार्‍यांचा विनयभंग भोरटेक पोलीस पाटलाविरोधात गुन्हा

  महिला ग्राम महसूल अधिकार्‍यांचा विनयभंग  भोरटेक पोलीस पाटलाविरोधात गुन्हा  भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  यावल ...

 महिला ग्राम महसूल अधिकार्‍यांचा विनयभंग 

भोरटेक पोलीस पाटलाविरोधात गुन्हा 

भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 यावल तालुक्यातील भोरटेक येथील पोलीस पाटलाने यावल तालुक्यातील एका गावातील 33 वर्षीय महिला ग्राम महसूल अधिकारी यांचा बामणोद -अकलूद रस्त्यादरम्यान सतत पाठलाग केला. त्या शासकीय काम करत असतांना अटकाव करून त्यांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात सदर महिला अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी रात्री पोलीस पाटलाविरुद्ध विनयभंग सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदारांनी या पोलीस पाटलाच्या निलंबनाचा प्रस्ताव देखील प्रांताकडे सादर केला आहे.


पोलीस पाटलाविरोधात गुन्हा

भोरटेक, ता. यावल येथील पोलीस पाटील धनराज गोंडू कोळी यांच्याविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात 33 वर्षीय महिला ग्राम महसूल अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 13 फेब्रुवारी 2025 पासून ते 7 एप्रिल 2025 या कालावधी दरम्यान सदर महिला अधिकारी या बामनोद ते अकलूद या रस्त्याने जात असतांना पोलीस पाटील धनराज कोळी याने सतत त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर त्या कार्यालयात जात असतांना कार्यालयात येऊन त्यांच्या शासकीय कामात तो सतत अटकाव करायचा आणि त्यांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य तो करत असे.

दरम्यान सतत त्याच्या या अशा कृत्यामुळे महिला अधिकारी या त्रस्त झाल्या होत्या. तेव्हा त्यांनी वरिष्ठांना याबाबत सांगितले आणि वरिष्ठांनी या प्रकाराची गंभीर दाखल घेत फैजपूर पोलीस ठाण्यात संबंधित पोलीस पाटलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या. महिला अधिकारी यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात पोलीस पाटील धनराज कोळी याच्याविरुद्ध विनयभंग विविध कलमान्वय गुन्हा दाखल केला.तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार मोती पवार करीत आहे.

No comments