दिल्ली येथील कॉमनवेल्थ सिटी या मैदानावर चौथ्या खेलो मास्टर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन चोपडा ( संजीव शिरसाठ ) (संपादक -:- हेमकांत गा...
दिल्ली येथील कॉमनवेल्थ सिटी या मैदानावर चौथ्या खेलो मास्टर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन
चोपडा ( संजीव शिरसाठ )
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दिल्ली येथील कॉमनवेल्थ सिटी या मैदानावर चौथ्या खेलो मास्टर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत देशभरातून अठरा राज्यांनी सहभाग नोंदविला असून महाराष्ट्र राज्याचे एकूण 120 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, 400 मीटर धावणे, 110 मीटर अडथळा शर्यत, 400 मीटर अडथळा शर्यत, गोळा फेक, भालाफेक, थाळी फेक, लांब उडी, उंच उडी, तेहेरी उडी, या क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला होता.
सदर स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने उत्तुंग भरारी मारत देशात चांगले नावलौकिक केले असून त्यामध्ये 100 मीटर धावणे 200 मीटर धावणे 400 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात विविध पदकांची मेजवानी महाराष्ट्रला दिली आहे. सदर स्पर्धेत पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी व पोलीस कॉन्स्टेबल रउप पिंजारी यांनी चमकदार कामगिरी दाखवत प्रत्येकी दोन दोन पदक प्राप्त केले आहेत.भगवान कोळी यांच्यासह सर्व खेळाळुंचे सर्वच स्तरावरून अभिनंदन केले जात आहे


No comments