चोपड्यात शाॅटी हाॅलीबाॅल स्पर्धेत धुळे संघ विजेता तर द्वितीय उपविजेता चोपडा चोपडा (प्रतिनिधी) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) येथे बी यु पव...
चोपड्यात शाॅटी हाॅलीबाॅल स्पर्धेत धुळे संघ विजेता तर द्वितीय उपविजेता चोपडा
चोपडा (प्रतिनिधी)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
येथे बी यु पवार म्युनिसिपल हाॅलीबाॅल क्लबच्या चोपडाच्यावतीने दिनांक ५ एप्रिल शनिवार रोजी सायंकाळी ग्रामीण पोलीस स्टेशन समोर म्युनिसिपल हायस्कुल येथे निमंत्रित शाॅटी हाॅलीबाॅल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेत जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा जिल्ह्यातील १६ संघानी सहभाग घेतला होता.
यात धुळे संघ विजेता तर द्वितीय उपविजेता बी यु पवार म्युनिसिपल हाॅलीबाॅल क्लब चोपडा विजेता ठरला.स्पर्धेचे उद्घाटन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले होते.प्रमुख पाहुणे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे आबा देशमुख राजाराम पाटील,मनिष गुजराथी,पत्रकार प्रविण पाटील, पंकज पाटील, किशोर चौधरी राजेंद्र पाटील, निशांत रंधे, राजेंद्र रायसिंग आदी उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते प्रथम विजेता संघास पाच हजार व ट्राॅफी द्वितीय तीन हजार तृतीय दोन हजार व चतुर्थ विजेता संघास एक हजार रुपयांचे उत्तेजनार्थ बक्षिस व कप देण्यात आले.या सह बेस्ट शुटर हसन अन्सारी धुळे, बेस्ट डिफेन्स हसन जनाब चोपडा,व बेस्ट नेटर सचिन कुमावत शिरपुर यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणुन बक्षिस देण्यात आले.पंच म्हणुन मनोज पाटील व सुहास पाटील यांनी तर गुणलेखक कपिल सोनवणे परीक्षीत चव्हाण यांनी कामकाज पाहिले.स्पर्धा यशस्वीतेसाठी आयोजक भैय्यासाहेब बाविस्कर (प्रशिक्षक) भैय्यासाहेब महेश पवार, हरेन्द्र बिडकर, दिनेश बाविस्कर, प्रदिप पाटील, शाम चव्हाण, महेश पाटील, विलास पाटील, महेंद्र पाटील,आर टी सैंदाणे,शेखर जाधव, मधुकर भोई सर, अशोक गुरव,भार्गव पाटील, प्रविण पाटील, भास्कर पाटील एजाज शेख हसन जनाब, जितु मराठे,भगवान नायदे यांनी परिश्रम घेतले.


No comments