adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एमआयडीसीत दहशत करणाऱ्यांना त्या चौघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

  एमआयडीसीत दहशत करणाऱ्यांना त्या चौघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या   सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर ...

 एमआयडीसीत दहशत करणाऱ्यांना त्या चौघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या  


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.६):- निंबळक व नागापूर परिसरात दोन वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये काही जणांनी हातात तलवारी दांडके लोखंडे रॉड घण व इतर शस्त्र घेऊन थेट जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती.या गुन्ह्यातील फरार झालेल्या संशयित आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.अभिषेक भिंगारदिवे, गणेश कदम,आशुतोष पाटोळे, सार्थक विधाटे अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहे.2 मार्च रोजी सकाळच्या सुमारास राजेंद्र पोपट कोतकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे नातेवाईक संदीप कोतकर यांच्या गणेश किराणा स्टोअर समोर काही आरोपींनी तलवारी दांडके लोखंडे रॉड घण व इतर शस्त्र घेऊन हल्ला केला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.15 फेब्रुवारी रोजी ज्ञानेश्वर बाळू साठे यांच्यावर सम्राट चौक नागापूर येथे जात असताना अभिषेक भिंगारदिवे व त्याच्या साथीदारांनी धारदार शस्त्रे व लोखंडी रॉडने मारहाण करून गळ्यातील 4 तोळे सोन्याची चैन व रोख ९ हजार २०० रुपये जबरदस्ती हिसकावले होते.या प्रकरणात देखील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्यातील सर्व संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग संपतराव भोसले,एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोंढे,पोलीस उपनिरीक्षक परदेशी,पोलीस अंमलदार सचिन अडबल,राजू सुद्रिक,किशोर जाधव,नवनाथ दहिफळे,अक्षय रोहकले,सानप, मोरे,दक्षिण मोबाईल सेलचे अंमलदार राहुल गुंडू यांनी केली आहे.

No comments