adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मध्यप्रदेश ओडीसातून शोधून पालकांच्या स्वाधिन केले अल्पवयीन ६ मुले रावेर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी

  मध्यप्रदेश ओडीसातून शोधून पालकांच्या स्वाधिन केले अल्पवयीन ६ मुले रावेर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक ह...

 मध्यप्रदेश ओडीसातून शोधून पालकांच्या स्वाधिन केले अल्पवयीन ६ मुले

रावेर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी

रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी

(संपादक हेमकांत गायकवाड)

 मध्यप्रदेश व ओडीसा राज्यातून रावेर तालुक्यातील अल्पवयीन २ मुले अन् मुलींना शोधून काढत रावेर पोलीसांनी महिन्याभरातच पालकांच्या स्वाधिन केल्याने  पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांच्या सह रावेर पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरी चे नागरिकांसह सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे 

सध्या अल्पवयीन मुले आणि मुली  पळून जाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.याबाबत पालकांसह पोलिस प्रशासनाचीही डोकेदुखी वाढली आहे. मात्र रावेर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल हे गुन्ह्यांचा तपास लावणे, आद्यकर्तव्य समजून सहकारी पोलीस आपले काम प्रामाणिकपणे नित्यनेमाने पार पाडत असल्याने पालकांना दिलासा देण्याचा प्रत्यय रावेर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून

नागरिकासह पालक वर्गाला आला दरम्यान, 

अल्पवयीन मुले मुली पळून जाण्याबाबत

 महिनाभरात रावेर पोलीस स्टेशनमध्ये अशा  सहा पालकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. या बेपत्ता मुलामुलींचा शोधण्याचे  मोठे आव्हान रावेर पोलिसांसमोर उभे ठाकले होते.रावेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष कार्यतत्पर पो.नि. डॉ. विशाल जयस्वाल यांनी आपल्या पोलीस कर्मचारी  सहकाऱ्यांचे दोन पथके केले या पथकाने कसोशीने प्रयत्न सुरू केले सर्वप्रथम  सीसीटीव्हीचे फुटेज आणि तांत्रिक प्रणाली वापरून मुलांचा शोध घेतला यातील दोन मुले आणि दोन मुली ओडिशा राज्यातील रायगड ओडिसा येथील जंगलातून 

शोध घेतला पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन यांनी त्यांना शोधून ताब्यात घेतले व रावेर पोलीस ठाण्यात आणले आणि त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.

दुसन्या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक तुधार पाटील व दीपाली पाटील यांनी मध्य प्रदेशातील कृष्णखोर खकणार येथून एक मुलगी आणि इंदोर येथून एक मुलगी अशा दोन्ही मुलींना ताब्यात घेऊन त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले.

ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर 

रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे 

यांच्या मार्गदर्शनाखाली  अल्पवयीन मुले मुली पळून गेल्याने पालक  त्रस्त होते. त्यांची मुले मुलींचा शोध घेऊन 

 रावेर पोलीस ठाण्याचे पो.नि. डॉ. विशाल जयस्वाल, एपीआय मनोज महाजन,तुषार पाटील, दीपाली पाटील सुनील वंजारी, सपकाळे गौरव पाटील विशाल पाटील महेश मोगरे सुकेश तडवी यांनी परिश्रम घेत महिन्याभरापासून पळून गेलेल्या चार मुली आणि दोन मुलांना रावेर पोलिसांनी मोठ्या शिताकिने पकडून आणून त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले.रावेर पोलीसांनी केलेल्या या कौतुकास्पद कामगिरी चे जनसामान्यांसह पालकवर्ग याकडून कौतुक केले जात आहे

No comments