आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त यावल बस स्थानकात पोलिस चौकीचे भुमीपुजन भरत कोळी यावल ता.प्...
आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त यावल बस स्थानकात पोलिस चौकीचे भुमीपुजन
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी यावल बस स्थानकात परिवर्तन फाउंडेशन यावल यांचे संस्थापक युवराज सोनवणे यांच्यातर्फे पोलीस चौकी उभारण्याचे आश्वासित करण्यात आले होते याप्रसंगी येथील जागेचे भूमिपूजन, फीत कापून आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते या ठिकाणी नारळ वाढवून पूजा करण्यात आली याप्रसंगी परिवर्तन फाउंडेशन चे संस्थापक युवराज सोनवणे यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला याप्रसंगी यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक डी बी महाजन भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे भूषण फेगडे संजू फिरके पाटील माजी नगरसेवक रवी भिल्ल कैलास पाटील व एसटी आगाराचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
यावल बस स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणावर या वर्षात पाकीटमारांचा धुमाकूळ तसेच महिलांची दागिने चोरणे असे प्रकार वाढल्यामुळे परिवर्तन फाउंडेशन ने पुढाकार घेऊन या ठिकाणी दोन पोलीस कर्मचारी असतील असे कळविले आहे तर लोखंडी प्लेटच्या आठ बाय सहा आकाराची पोलीस चौकी देण्याचे जाहीर केल्यामुळे या फाउंडेशनचे आमदार अमोल जावळे यांनी आभार व्यक्त केले तसेच एसटी आगार प्रमुख डी बी महाजन यांनी या ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे जर कायमस्वरूपी एक महिला व पुरुष पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती केली तर निश्चितच अशा चोरट्यांना आळा बसेल यावल एसटी आगारातर्फे पोलीस स्टेशनला नेहमी या संदर्भात पत्र व्यवहार करण्यात आला असल्याचे आमदार महोदयांन समोर सांगितले येत्या आठ दिवसात या ठिकाणी पोलीस चौकी तयार करून आमदार साहेबांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येईल असे परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक युवराज सोनवणे यांनी सांगितले यावेळी एसटी आगारात तर्फे या फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी आमदार अमोल जावळे यांनी अशा दानशूर दातृत्व असलेल्या फाउंडेशनच्या मार्फत जर प्रशासनाला सहकार्य केले तर निश्चितच प्रशासनामध्ये सुसूत्रता येईल व विकृत घटनांना व चोरट्यांना लगाम बसेल असे छोट्याखानी समारंभात सांगितले


No comments