श्री गणेश सार्वजनिक वाचनालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) - भारतीय संविधानाचे ...
श्री गणेश सार्वजनिक वाचनालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
- भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती न्हावी येथील श्री गणेश सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयात साजरी करण्यात आली.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस यशवंत बेंडाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. ग्रंथालयाचे अध्यक्ष हेमकांत गाजरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाबद्दल मनोगत व्यक्त केले. प्रसंगी वाचनालयाचे उपाध्यक्ष शरद चोपडे,सचिव युवराज तळले, उपसरपंच चेतन इंगळे, यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या संचालक प्रवीण वारके, ग्रंथपाल ललित इंगळे, शिपाई भास्कर भोगे व वाचक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सचिव युवराज तळले यांनी मानले.

No comments