त्र्यंबकेश्वरला होणार स्वतंत्र बाजार समिती जयवंत हागोटे त्रंबकेश्वर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मुख्यमंत्री बाजार समिती योजने...
त्र्यंबकेश्वरला होणार स्वतंत्र बाजार समिती
जयवंत हागोटे त्रंबकेश्वर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत प्रत्येक तालुकास्तरावर नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्याबाबत शासन निर्णय काढण्यात आला आहे त्यानुसार त्र्यंबकेश्वर या तालुक्यात नव्याने बाजार समिती स्थापन होणार आहे यापूर्वी त्र्यंबकेश्वर हा तालुका नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्रात होता शासनाच्या या निर्णयामुळे विद्यमान संचालक मंडळाचे काय होणार ? याकडेही शेतकरी सभासद यांचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रतिक्रिया
त्र्यंबकेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती चालू झाल्यावर शेतकऱ्यांना नाशिकला भाजीपाला घेऊन जायचे काही गरज भासणार नाही त्रंबकेश्वर लाच लिलाव होईल. शेतकऱ्यांचा वेळ वाचेल. शेतकऱ्यांसाठी आनंदाची ही बाब आहे.
बुधा ढोरे सामाजिक कार्यकर्ता

No comments