पीक उत्पादनासाठी मातीत मिसळलेले पेनकिलर माती मागतेय पेनकिलर हा ग्रामीण खान्देशी कवी सागर जाधव यांचा ६८ पानांचा शेतीमातीने समृद्ध आणि पीक...
पीक उत्पादनासाठी मातीत मिसळलेले पेनकिलर
माती मागतेय पेनकिलर हा ग्रामीण खान्देशी कवी सागर जाधव यांचा ६८ पानांचा शेतीमातीने समृद्ध आणि पीक व्यवस्थापनातील बदलते तंत्रज्ञान त्यातून बिघडलेले मातीतील रासायनिक खतांचे गुणधर्म ह्यांना अनुसरून लिहिलेला काव्यसंग्रह
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी .
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
देठापासून कांदा मारतोय पीळ
पातही झालीय
करपून पिवळी
अन ह्युमिक शिवाय आतली
नाही वाढत पांढरी मुळी
केमिकलचा पाजला ओव्हरडोस
अशक्त झालंय वाफ्याचं पोट
खरे तर ग्रामीण माणूस हा हौशी मौजेच्या गोष्टी बरोबरच शेती समृद्धी आणि आर्थिक विकासासाठी बदलते तंत्रज्ञान श्रम संस्कृतीला साजेसे करून स्वीकारत आहे. कांदा आहे चार महिन्यांचे पीक अगदी सुरुवातीला वाफे तयार करून मेहनत घ्यावी लागते. मात्र जमिनीमध्ये पीक उत्पादनासाठी वाढीसाठी आज मोठ्या प्रमाणात केमिकलचा म्हणजे पेनकिलरचा वापर होताना दिसतो त्यामुळे जमिनीचा कस नष्ट होऊन पोत ( वरचा थर) बिघडते. आणि जमिनी भरगोस उत्पन्नासाठी निकामी होता त्यामुळे त्याचा परिणाम कांदा पिकावर होतो.
उगवून आला कोंब
वेळेवर देत गेलो पाणी
तरी जगण्याच्या वेणा
झाल्या नाहीत कमी
उगवून येण्या आधी शोधू
मॉल्यूक्युल बुरशीचे
तणाव सुद्धा सापडतील
रिसेड्यू माझ्या घामाचे
मातीवर चढलाय बुरशीचा थर
सुटत नाही फिटत
कोंबा बांधावरच मर
मातीत जनली नाही
तर खायचं काय धतुऱ्या
पाणी आणि बी बियाणे ही शेतीतील प्रमुख आदाने परंतु पीक नियोजनाचे तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक आहे. अगदी पेरणी पासून पीक वाढे पर्यंत पीक उत्पादनासाठी फवारणी खत पेरणी यांचा मातीत समावेश होतो. त्यामुळे जमिनीचा कस नापीक होतो. त्याचा परिणाम उत्पादनावर होतो त्यामुळे राबराबत्या श्रमिक बळीराजाला मोबदला कमी येऊन अपेक्षित उत्पन्न होत नाही शेवटी मातीतून उगवलेच नाही तर शेतकरी पिकात चे उत्पन्न घेणार नाही तर अन्नधान्याचा साठा होणार नाही आणि जनतेला अन्न भेटणार नाही अशी खंत कवी व्यक्त करतात.
पहाटेच्या धुक्यात
पीक सार न्हालं
उगवलेलं मेलं
मेलेल सडलं
सडलं म्हणून गाढलं
पावसाळ्यातील ओल्या दुष्काळातील पिकावरील दुष्परिणाम हे खरे तर निसर्गाचे चक्र थंड धुक्यात पिकात ओलावा दाटून येतो अशावेळी कुजून मातीलाच मिसळते आणि श्रम वाया जातो.
ऑरगॅनिक शेती
भोपळा भ्रमाचा
पैसा घामाचा मातीआड
शेणाच्या वासाला
आणलाय पर्याय
जिवाणूंची माय
व्यायली ना
रासायनिक खतांच्या माऱ्यामुळे पिकांतील चक्र बदलते आणि मातीला रासायनिक खताची सवय होते कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ हा निसर्गाचा नित्यक्रम चालूच राहतो परंतु उन्हाळ्यात तग धरून राहिलेले माती हे पावसाळ्यात पूर्ण युरिया, सुफला खताने ओले चिंब होऊन मूलद्रव्य मिसळून नापीक होते त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय शेती काळाची गरज बनली आहे. शेणखता शिवाय पर्याय नाही अशी कवीने कवितेतून अपेक्षा व्यक्त केली आहे.अशी माहिती आदिवासी संशोधक व कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील यावल येथील प्राध्यापक सुभाष कामडी यांनी दिली आहे.
No comments