महायुती सरकारने जाहीर केल्या प्रमाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी-चोपडा येथे राष्ट्रीय काँग्रेस (आय) पक्षाचे चोपडा तहसिलदारांना...
महायुती सरकारने जाहीर केल्या प्रमाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी-चोपडा येथे राष्ट्रीय काँग्रेस (आय) पक्षाचे चोपडा तहसिलदारांना निवेदन!
चोपडा प्रतिनिधी :-
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महायुती सरकारने जाहीर केल्या प्रमाणे शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आज दिनांक ११ रोजी तहसील कार्यालय चोपडा येथे काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक शामभाऊ उमाळकर तसेच जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष अँड.संदीप सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत चोपडा तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले,यात विधानसभा निवडणुकी प्रसंगी राज्यातील महायुतीतील प्रमुख पक्षांनी जाहीरनामा काढून शेतकऱ्यांना कर्ज माफी,मोफत वीज, बाबत जनतेला आश्वासन दिले होते.व सरकार सत्तेत आल्यास सर्व आश्वासने पूर्ण करण्याची हमी दिली होती,महाराष्ट्रातील राज्य सरकारने कर्ज माफी देता येणार नाही हे जाहीर करून सर्व सामान्य नागरिक व शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. अशा फसवणूक करणाऱ्या राज्य सरकारच्या राष्ट्रीय काँग्रेस कडून जाहीर निषेध करून निवेदन देण्यात आले.तसेच केंद्र सरकार ने नुकतीच घरगुती वापराचा गॅस सिलिंडरच्या किंमती ५० रुपयांनी वाढल्या आहेत. सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनंतर आता गॅस सिलिंडरची दरवाढही जाहीर केली,यामुळे सामान्यांना आणखी एक झटका बसला आहे.
८ एप्रिलपासून गॅस सिलिंडर १० किंवा २० नाही तर चक्क ५० रुपयांनी महाग झाला आहे. सरकारने घरगुती वापरासाठीचा एलपीजी गॅस सिलिंडर ५० रुपये महाग केल्याचं जाहीर केले आहे. उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत ५०३ रुपयांना मिळणारा सिलिंडर आता ५५३ रुपयांना मिळणार आहे तर ही योजना सोडून असलेला एक सिलिंडर ८०३ रुपयांवरुन ८५३ रुपये इतका झाला आहे. ८ एप्रिलपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.ही दरवाढ त्वरित रद्द करावी.राज्यातील कायदा व सुव्यवस्था पुर्णपणे कोलमडली आहे.याकडे लक्ष देणे आवश्यक आहे,अशी निवेदनात मागणी केली .
यावेळी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश सिताराम पाटील,अजबराव पाटील,ॲड एस.डी.पाटील,प्रमोद पाटील,मासूम तडवी,गोपाल धनगर,शशिकांत साळुंखे,बाळकृष्ण सोनवणे,देवानंद शिंदे,अनिल पाटील,फातिमाबी पठाण, सुरेखा माळी,योगिता चौधरी,अशोक साळुंखे,जहिर भाई, वजाहत काझी,जुनेद खान,शांताराम लोहार, यशवंत खैरनार,
सुनिल बागुले,राजेंद्र पाटील,मधुकर पाटील, तालुकाध्यक्ष संजय सोनवणे,शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे ,आरिफ सिद्धिक,इलीयस पटेल,लक्ष्मण कविरे, मेहबूब तेली, हेमराज पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments