नूतन मराठा महाविद्यालयात ईद-मिलन कार्यक्रम उत्साहात साजरा जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगांव येथील नूतन मराठा महाविद्याल...
नूतन मराठा महाविद्यालयात ईद-मिलन कार्यक्रम उत्साहात साजरा
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगांव येथील नूतन मराठा महाविद्यालयात ईद-मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख होते. या प्रसंगी आपल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल पी देशमुख म्हणाले की आपल्या नूतन मराठा महाविद्यालयात जातीय तसेच धर्मिय सलोखा राखण्याची परंपरा आहे. सर्व धर्म समभाव हा विचार महाविद्यालयात आधी पासूनच रुजला आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय या तत्त्वाच्या पायावर उभ्या असलेल्या या महाविद्यालयात आजपावेतो जातीय अथवा धार्मिक तेढ निर्माण होईल असे एकही उदाहरण निदर्शनास आले नाही म्हणूनच या महाविद्यालयाची मायबाप काॅलेज म्हणून परिसरात सर्वत्र ख्याती आहे असे सांगितले...
उर्दू विभाग प्रमुख डॉ. आफ़ाक़ शेख़ यांनी ईद मिलन कार्यक्रमाच्या आयोजनामागील भुमिका आपल्या प्रास्ताविकात नमुद केली...
या प्रसंगी उपप्राचार्य. डॉ. एम.एस. पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एन. जे.पाटील, आई.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा.एस. आर. गायकवाड, प्रा.आर. बी.देशमुख, डॉ. आर. बी. संदानशिव प्रा. गज़ाला शेख़ आदी सह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन ज़य्यान अहमद यांनी केले व आभार मोईन शेख़ यांनी मानले.


No comments