अवैद्य गौण खनिज उत्खनन,वाहतुकीची तक्रार करीत हप्तेखोरीचा आरोप करत महसूलची बदनामी, तहसीलदार मोहनमाला नझिरकर. भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी/ इदू...
अवैद्य गौण खनिज उत्खनन,वाहतुकीची तक्रार करीत हप्तेखोरीचा आरोप करत महसूलची बदनामी, तहसीलदार मोहनमाला नझिरकर.
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी/ इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
श्री निलेश मुरलीधर राणे माजी नगराध्यक्ष फैजपूर यांनी दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी प्रसिद्धी माध्यमात प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ मधून तसेच माननीय प्रांत फैजपूर व आदरणीय जिल्हाधिकारी जळगाव यांना सादर केलेल्या निवेदनात मधुकर सहकारी साखर कारखाना येथील अवैध गौण खनिज उत्खनन बाबत केलेले वक्तव्य ज्यात मधुकर सहकारी साखर कारखाना मागील गटामध्ये अवैध गौण खनिज उत्खनन होत आहे आणि त्यामध्ये तलाठी, मंडळ अधिकारी पासून तहसीलदर व प्रांत अधिकारी आणि वरपर्यंत हप्ते आहेत आणि सर्वजण सहभागी आहेत अशा स्वरूपाचे वक्तव्य केले आहे आणि त्या अनुषंगाने प्रांत फैजपूर, तहसीलदार यावल, तलाठी आणि मंडळ अधिकारी पर्यायाने महसूल विभागाची केलेल्या बदनामी बाबत तहसील कार्यालय यावल, महसूल विभागाच्या वतीने खालील प्रमाणे माहिती देत आहोत. वास्तविकपणे 17 एप्रिल 2025 रोजी माननीय प्रांत फैजपूर यांना श्री राणे यांचा अवैध गौण खनिज वाहतुकीबाबत व्हिडिओ कॉल आणि फोन प्राप्त झाला त्यावेळी मा. प्रांत फैजपूर आणि तहसीलदार यावल हे फैजपूर प्रांत कार्यालयात उप विभागीय जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण उपविभाग, चोपडा यांचे मार्फत आयोजित विविध योजनेंतर्गत झालेल्या मृदसंधारण व जलसंधारण कामाची प्रत्यक्ष पडताळणी (ground truthing) च्या बैठकीत तालुक्यातील अन्य अधिकाऱ्यांसोबत व्यस्त होते त्यामुळे सदर तक्रार प्राप्त होतात तलाठी फैजपूर आणि मंडळ अधिकारी बामनोद यांना तात्काळ दूरध्वनी द्वारे सूचित करण्यात आले आणि त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात आली. संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकारी घटनास्थळी पोहोचले त्यावेळी त्यांना तेथे गौण खनिज उत्खनन करताना कोणतेही वाहन आढळून आले नाही परंतु श्री राणे यांनी व्हाट्सअप द्वारे माननीय प्रांत फैजपूर आणि अप्पर जिल्हाधिकारी जळगाव यांना पाठवलेल्या संदेशाद्वारे तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना तात्काळ घटनास्थळी पाहणी करून अहवाल सादर करण्याबाबत दिनांक 17 एप्रिल २०२५ रोजीच कळविण्यात आले होते त्या अनुषंगाने तलाठी व मंडळ अधिकारी यांचा संयुक्त अहवाल या कार्यालयास दिनांक 18/04/2025 रोजी प्राप्त झाला असून संबंधितांवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 (7) व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा अध्यादेश 2015 दिनांक 12 जून 2015 नुसार सुधारित कलम 48(8) (2) यानुसार दंडात्मक कारवाई प्रस्तावित करीत आहोत.
श्री राणे यांनी तहसीलदारांच्या हप्ते चालू आहेत आणि त्यामुळे कारवाया होत नाहीत अशा स्वरूपात जे वक्तव्य केलेले आहे ते सत्य नसून वस्तुस्थिती पुढील प्रमाणे आहे. 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024-
1) तहसील कार्यालय यावल येथील 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीमध्ये गौण खनिज विभागात तहसील कार्यालय यावल यास 410 लक्ष टार्गेट देण्यात आले होते. त्यापैकी 347.98 लक्ष (86.35%) टार्गेट पूर्ण झालेले आहे.
2) सदर कालावधीत अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या एकूण 58 वाहनांवर कारवाया करण्यात आलेले आहेत.
3) तसेच 388 ब्रास रेतीचा व 1200 ब्रास डबरचा लिलाव देखील करण्यात आलेला आहे.
4) तसेच या कालावधीत अवैध गौण खनिज वाहतूक करणारे दंड नं भरलेले जमा वाहण यांचा लिलाव करण्यात आलेला आहे.
5) या सर्वातून शासनास गौण खनिज (0853) या लेखाशीर्षात एकूण 3 कोटी 48 लक्ष महसूल प्राप्त झालेला आहे.
1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025-
1) त्याचप्रमाणे 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये गौण खनिज विभागात तहसील कार्यालय यावल यास 375 लक्ष टार्गेट देण्यात आले होते. त्यापैकी 357.88 लक्ष (95.43%) टार्गेट पूर्ण झालेले आहे.
2) सदर कालावधीत अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या एकूण 37 वाहनांवर कारवाया करण्यात आलेले आहेत.
3) तसेच या कालावधीत अवैध गौण खनिज वाहतूक करणारे दंड नं भरलेले जमा वाहण यांचा 25/09/2024 व 13/022025 रोजी लिलाव करण्यात आलेला आहे.
4) या सर्वातून शासनास गौण खनिज (0853) या लेखाशीर्षात एकूण 3 कोटी 57 लक्ष महसूल प्राप्त झालेला आहे.
अवैध गौण खनिज वाहतूक रोखत असताना तहसील कार्यालय यावल येथील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर एक एप्रिल 2023 ते आज पर्यंत एकूण तीन वेळा हल्ले झालेले असून यामध्ये गुन्हे दाखल आहेत. 1 MPDA अंतर्गत कारवाई देखील झालेली आहे.
तसेच चालू वर्षामध्ये एक एप्रिल 2025 पासून केवळ 19 दिवसांमध्ये 3 अनधिकृत गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तहसील कार्यालय यावल मार्फत कारवाई देखील करण्यात आलेली आहे. सर्व बाबर्बोचा विचार करता तहसीलदार यावल म्हणून 5 जून 2023 रोजी कार्यभार स्वीकारल्यापासून आजपर्यंत तब्बल 96 वाहनांवर कारवाई करण्यात आलेली असून शासनास एकूण गौण खनिज मध्ये सुमारे 7 कोटी 6 लाख एवढा महसूल प्राप्त करून दिलेला आहे. त्यामुळे श्री राणे हे जी तक्रार करत आहेत त्यामध्ये कोणतेही तथ्य नसून हे महसूल विभाग आणि तहसील कार्यालय यावल यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
No comments