adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं

  माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड)  _मळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं_   _गु...

 माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

 _मळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं_ 

 _गुलाब जाईजुई मोगरा फुलवीत_ 

हे जुने शेतकरी गीत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेलं आहे. जे करूण रसाने ओथंबून गेले आहे.आजही मोबाईल युट्यूबवर, आकाशवाणीच्या संगीतातील कार्यक्रमात सादर केले जाते.श्रमिक, शेतकरी,शेतमजूर कामातील श्रम विसरण्यासाठी ऐकून आनंद घेताना दिसतात. रबी हंगामातील कष्टकरी  जीवनावर आधारित शेतमळ्यातील बळीराजाची श्रमसंस्कृती आणि लळा ही बाब गीतातून अधोरेखित होते. रबी हंगामात मळ्यातील पीकांच्या वाढिसाठी  पाटाचं सावकाश वाहणारे नितळगार पाणी पुर्ण पीकातील माती भीजवते तसेच शेतमळ्यातील काठावर लावलेली फुलं झाडे गुलाब,जाई, जुई मोगरा यांना जोर येऊन फुलांना बहर येतो.

  _दादाच्या मळ्यामंदी मोटचं मोटं पानी_ 

   _पाजिते रान सारं मायेची वयनी_ 

   _हसत डुलत मोत्याचं पीक येतं_ 

 ग्रामीण आदिवासी भागातील शेतकरी, कष्टकरी जीवनात नाते संबंधातील  प्रत्येक घटकाला गीतातून स्पर्श केला आहे.दादा म्हणजे मोठा (भाऊ) जो शेतीचा मालक आहे. पुर्वी शेतंमळ्याला पाणी देण्यासाठी मोटं वापरली जात होती. हे सर्व काम भावाची बाई (वयनी) अतिशय कष्टाळू अंतःकरणाने पुर्ण मळ्यात पीकांच्या वाढिसाठी पोटच्या लेकराला जशी माया द्यावी तशी काळजीपूर्वक काम करीत असते.त्यामुळे फुललेल्या शेतमळ्यातील जोंधळा जणू हवेशीर डोलतांना हसत डुलत आहे याचा  आनंद वाटला आहे‌.

   _लाडकी लेक राजाचा ल्योक_ 

    _लगीन माझ्या चिमनीचं_ 

 या गीतातून कोवळ्या उन्हातील हिरवेगार शेतपीकाप्रमाणे कोवळ्या वयात खुलून दिसणारी सुंदर मुलगी ही परक्या घरातील राज्य चालवणाऱ्या लोकांची होणार  ती आता लग्नाच्या वयात आली आहे. याचा तीच्या वडलांना आनंद होतो.

   _सावळा बंधुराया, साजिरी_ _वयनीबाई_ 

 _गोजिरी शिरपा-हौसा म्हायेरी माज्या_ _हाई_ 

 _वाटंनं म्हयेराच्या धावत मन जातं_ 

 सावळा बंधु म्हणजे काम कष्ट करून काळा,सावळा रंग परिधान केलेला पेहराव त्याचा मातीशी सबंध येतो साजिरी वयनीबाई म्हणजे नेहमिच सुंदर दिसणारी (गोजिरी)भावाचं बक्कळ प्रेम माहेरी भेटत असत त्यामुळे कधीही माहेरच्या वाटेकडे ओढावलेलं मन लागलेलंच असतं

 _गडनी सजनी गडनी सजनी गडनी गं_ 

गडनी सजनी ( सोबती साथीदार) बरोबर असावा बहिणीला असे वाटते 

_राबतो भाऊराया मातीचं झालं सोनं_

     _नजर काढू कशी जिवाचं लिंबलोण_

      _मायेला पूर येतो,पारुच मन गातं_ 

   या शेतकरी गीतांमधून बहिनीचे भावाबदलचे प्रेम,आपुलकी आणि बंधुभाव यांचा साक्षात्कार दिसून येतो श्रम संस्कृतीवर आधारित शेतमळ्यातील मातीत राबून कष्ट घेतले तर कष्टाचे चिज होऊन आणि मातीतून सोनं(धान्य) तयार होते.परंतु त्यासाठी जिवाचं रान करून शरीराला घाम येईपर्यंत मेहनत झाली पाहिजे हे पाहून आईच्या आनंद अश्रू अनावर येतात पारू हे मुलीचं नाव आहे. जीने शेती मातीत राबणाऱ्या भावा बदल आणि वयनी (भावजयी) बद्दल नाते संबंधातील जिव्हाळा निर्माण करून श्रम संस्कृतीला महत्त्व दिले आहे.अशी माहिती आदिवासी संस्कृती संवर्धक अभ्यासक सुभाष कामडी यांनी दिली आहे.

No comments