adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बोराळे येथील अखंड हरीनाम संकीर्तन भागवत कथेची शुक्रवारी सांगता

  बोराळे येथील अखंड हरीनाम संकीर्तन भागवत कथेची शुक्रवारी सांगता    भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल तालुक्यात...

 बोराळे येथील अखंड हरीनाम संकीर्तन भागवत कथेची शुक्रवारी सांगता 


 भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल तालुक्यातील बोराळे गावात दिनाक १८ पासून, मराठी नवीन वर्ष गुढीपाडवा व रामनवमी उत्सव निमित्ताने संगीतमय श्रीमद भागवत कथा व अखंड हरीनाम संकीर्तन सोहळा सुरु असून शुक्रवारी सागता होणार आहे तरी परिसरातील वारकरी संप्रदायातील भक्तानी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे 

    सप्ताह प्रारंभ हा मिती चैत्र शु, ५ शुक्रवार दि:- १८/०४/२०२५ पासून या शुभ मुहूर्तावर प्रारंभ झाला असून, प्रमुख उपस्थिती वर्डी ता. चोपडा येथील नगराज महाराज यांची लाभली आहे,तर सकाळी ५ ते ६ काकडा आरती व हरिपाठ,दुपारी २ ते ५ श्रीमद भागवत कथा पारायण व रात्री ८ ते १० संकीर्तन चे नियोजन करण्यात आले असून कथावाचक ह.भ.प. पुंडलिक महाराज चिखलीकर,कथा गायनाचार्य ह.भ.प.श्रीराम पाटील महाराज बेंदुरा,ह.भ.प.विजय महाराज माटरगाव, मृदूंगचार्य व तबला वादक ह.भ.प गणेश महाराज विटाळीकर, विनेकरी ह.भ.प काशिनाथ महाराज साकळी,  यांचे होते किर्तन ह.भ.प प्रकाश महाराज मनवेल,तर कीर्तनकर महाराज १८ एप्रिल रोजी ह.भ.प. गजानन महाराज धानोरेकर, १९ एप्रिल ह.भ.प. राधाताई महाराज भोलाणे, २० एप्रिल ह.भ.प. हेमंत महाराज भुसावळ, २१ एप्रिल ह.भ.प. संजय महाराज मोहराळे,२२ एप्रिल ह.भ.प. योगेश महाराज चिंचोली, २३ एप्रिल ह.भ.प. महेश महाराज एकलग्न,२४ एप्रिल ह.भ.प. रितेश महाराज मलकापूर यांचे असून दिनाक २४ ला संद्याकाळी ४ ते ७ वाजे पर्यंत गावातून दिंडी सोहळाचे आयोजन असून २५ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११ ह.भ.प. पुंडलिक महाराज चिखली यांचे काल्याचे कीर्तन असणार आहे, २५ एप्रिल रोजी दुपारी १२ ते ५ वाजे पर्यंत महाप्रसादाचे नियोजन आहे, सदर सप्ताह मध्ये गावातीलच, राकेशसिंग परदेशीं, शरद चौधरी, प्रमोदसिंग राजपूत, बलराजसिंग राजपूत, संज्जुसिंग राजपूत, दिलीप टेकडे, उमेशसिंग राजपूत, मुरलीधर पाटील, सुवागसिंग राजपूत, मयूर चौधरी, मनोज चौधरी, राजेंद्र पाटील, संजय चौधरी, सुधाकर चौधरी या भाविकांनी भोजनाची व्यवस्था सात दिवस केली असून सदर कार्यक्रमाचा लाभ परिसरातील भाविकांनी घ्यावा असेआवाहन  बोराळे, चुंचाळे भक्तांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments