डोंगर कठोरा शाळेत घेण्यात आले कायदेविषयक जनजागृती शिबिर भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज दिनांक 24 एप्रिल रोजी...
डोंगर कठोरा शाळेत घेण्यात आले कायदेविषयक जनजागृती शिबिर
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज दिनांक 24 एप्रिल रोजी डोंगर कठोरा येथील अ.ध.चौधरी माध्यमिक आणि कनिष्ठ विद्यालयामध्ये यावल तालुका विधी सेवा समिती च्या माध्यमातून संविधानात भारतीय नागरिकांसाठी नमूद केलेल्या कर्तव्यांबाबत प्रबोधन पर जनजागृती शिबिर घेण्यात आले.
यावल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तसेच यावल न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश श्री. आर. एस. जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार यावल तालुक्यातील डोंगर कठोरा या गावी अ. ध. चौधरी माध्यमिक व कनिष्ठ विद्यालयांमध्ये 'संविधान आणि संविधानामध्ये भारतीय नागरिकांसाठी नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्याबाबत' विद्यार्थ्यांना माहिती करून देण्यात आली. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे. आपल्या संविधानामध्ये अधिकार आणि कर्तव्य अशा दोन्ही बाबींची सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
प्रत्येक व्यक्ती हा आपल्या अधिकारांबाबत जागरूक असतो परंतु त्याचबरोबर त्याला आपल्या कर्तव्यांची जाणीव असणे ही आवश्यक असते. कारण अधिकार आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. या अनुषंगाने या कायदेविषयक शिबिरामध्ये प्रबोधन करण्यात आले. संविधानाचे पालन करत असताना राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा सन्मान राखणे, स्वातंत्र्यलढ्याच्या आदर्शांचे पालन करणे, भारताचे सार्वभौमत्व एकता आणि अखंडत्त्व टिकवणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणे. देशाची सुरक्षा करणे, प्रसंगी देश सेवा करणे, देशासाठी लढणे याविषयी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते शशिकांत वारूळकर हे होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. नितीन झांबरे हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली फेगडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार चेतन चौधरी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक संजीव तडवी समांतर विधी सहाय्यक हेमंत फेगडे, अ.ध.चौधरी विद्यालयाचे शिक्षक प्रवीण कुयटे , राजू चिमणकारे तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments