ग्रामीण भागात गॅस सिलिंडरच्या दरवाढ बरोबर अतिरिक्त रकमेचीही वसुली एजन्सी चालकांकडून नकार डिलवरी बॉयकडून सर्रास वसूली; महसुल विभागाचे दुर्...
ग्रामीण भागात गॅस सिलिंडरच्या दरवाढ बरोबर अतिरिक्त रकमेचीही वसुली एजन्सी चालकांकडून नकार
डिलवरी बॉयकडून सर्रास वसूली; महसुल विभागाचे दुर्लक्ष
![]() |
| काल्पनिक फाईल चित्र |
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मनवेल ता यावल : वाढत्या महागाई मुळे आधीच जनता हैराण झाली आहे अव्वाच्या सव्वा वीजबिलाने सर्वसामान्य नागरिक आधीच जेरीस आला आहे. त्यातच गॅस सिलिंडरच्या दराने नऊशे रुपयांच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. वाढलेल्या दरात गॅस सिलिंडर ऐवजी ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटू लागल्या आहेत. त्यात डिलिव्हरी बॉय घरपोच डिलिव्हरीच्या नावाखाली सिलिंडरच्या दराव्यतिरिक्त अतिरिक्त रक्कम घेत वसुली सुरु केल्याने अनेकदा डिलिव्हरी बॉय आणि ग्राहकांमध्ये खटके उडून वाद होताना दिसून येत आहेत
इंधन दरवाढीप्रमाणे गॅस सिलिंडरचे दर आकाशाला भिडत आहेत. ८०८ रुपये वरून ८५८ रुपये दरात ग्राहकांना सिलिंडर खरेदी करावे लागत आहे. सरकारकडून देण्यात येणारी सबसिडीही फक्त उज्वला च्या लाभार्थ्यांना 300 रुपये मिळत आहे तर सामान्य नागरिकांना सबसीडी बंद झाली असल्याने खिशाला चांगलीच झळ बसत आहे.
त्यात डिलिव्हरी बॉयही मागे नाहीत. त्यांच्याकडून ग्राहकांचा चांगलाच छळ सुरू आहे. गॅस एजन्सीतर्फे ग्राहकांना घरपोच सिलिंडर पोहोचवण्यासाठी वेतन दिले जाते. असे असतानाहीग्राहकांकडून अतिरिक्त रक्कमेची वसुली केल्या जात आहे.
काही दिवसांपूर्वी सिलिंडरचे दर ८०८ ते साडे आठशे रुपयांपर्यंत होते. तसेच सरकारतर्फे सबसीडीही मिळत होती. त्यामुळे डिलिव्हरी बॉयला दहा रुपयांपर्यंत अतिरिक्त रक्कम देणे शक्य होते. परंतु, सध्या दरही वाढले असूनसबसिडीही मिळत नाही. अनेक भागांतील डिलिव्हरी बॉय ठराविक रकमेचा आग्रह धरत असल्याने बऱ्याचदा पैसे देण्या-घेण्यावरून दोघांमध्ये खटके उडत आहेत. ग्राहकांकडून ३० ते ४० रुपयांपर्यंत अतिरिक्त रक्कम घेतल्याने अनेक ठिकाणी बाचाबाचीचे प्रसंग निर्माण होत आहे.
याबाबत यावल येथील गॅस एजन्सी येथे संपर्के साधला असता त्यांनी अति रिक्त लागत असलेले ३० रुपये डिलेवरी करणाऱ्या बॉयला देऊ नये पावती प्रमाणे पैसे द्या असे सांगीतले होते मात्र ती अतिरिक्त वसुली सुरूच असल्याने ग्राहकांची पिळवणुक होत आहे

No comments