साकळी येथे गुरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी नवीन हाळकुंडाचे बांधकाम लवकरच होणार ! सरपंच दिपक पाटील यांचा पुढाकार भरत कोळी यावल ता.प्रतिनिध...
साकळी येथे गुरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी नवीन हाळकुंडाचे बांधकाम लवकरच होणार !
सरपंच दिपक पाटील यांचा पुढाकार
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
साकळी ता.यावल:- आजच्या धकाधकीच्या युगात मुक्या प्राण्यांची सेवा व जीवदया किती महत्त्वाची आहे .हे आपल्या धडक निर्णयाच्या कृतीतून सरपंच दिपक पाटील यांनी आपल्या दाखवून दिलेले आहे.त्यांच्या या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
अहिंसा परमो धर्म:'जियो और जीने दो' अर्थात् सह-अस्तित्व, अहिंसा एवं अनेकांत चा संदेश जैन धर्मातील २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांनी दिलेला आहे.या संदेशाचे पालन व्हावे व मुक्या प्राण्यांची सेवाभावी या उद्देशातून विश्व नमोकार महामंत्र दिवस तसेच भगवान महावीर जयंतीनिमित्त प्रभू महावीरांच्या सिद्धांतांवर साजरी करण्याचा संकल्प डोळ्यासमोर ठेवून रानावनात चरायला गेलेल्या गावातील गुरांना रस्त्यालगतच्या भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देण्यासाठी हाळकुंड बांधून द्यावे या मागणीसाठी साकळी येथील गुराखी मंडळी तसेच गौरीशंकर गोशाळेचे प्रणेते योगेश (आप्पा) खेवलकर आपल्या साकळी गावाचे लोकप्रिय लोकनियुक्त सरपंच दिपक नागो पाटील यांना दि.९ एप्रिल २०२५ रोजी निवेदन दिले.या निवेदनावर तात्काळ दखल घेत सरपंच दिपक पाटील यांनी धडक निर्णय घेऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नविन हाळकुंडाचे बांधकाम लवकरात- लवकर सुरू करण्याची कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.गुरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होण्याने भविष्यात गुरांची सदरील समस्या दूर होणार आहे.सरपंच दिपक पाटील हे गावाच्या हिताचे जे-जे निर्णय समोर येतील ते-ते निर्णय प्राधान्यक्रमाने सोडवून गावाच्या अनेक अडीअडचणी व समस्या दूर करीत आहे.गावासाठी नवीन हाळकुंड बांधकाम करण्याचे निर्णय घेऊन सरपंच दिपक पाटील यांनी आपल्या सर्वांसाठी जीवदया आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे असा संदेश आपल्या कृतीतून ग्रामवासियांना दिला आहे.त्याबद्दल सरपंच दिपक पाटील व ग्रामपंचायत प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments