चोपड्यात दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम हात व पाय बसविणे कलीपर्स याचे मोजमाप व तात्काळ वितरण शिबिराचे आयोजन चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेम...
चोपड्यात दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम हात व पाय बसविणे कलीपर्स याचे मोजमाप व तात्काळ वितरण शिबिराचे आयोजन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज भगिनी महिला मंडळ नाट्यगृह येथे चोपडा जिल्हा प्रशासन, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद जळगाव,व सक्षम देवगिरी प्रांत जळगाव, केशव स्मृती प्रतिष्ठान, एस आर ट्रस्ट मध्य प्रदेश व ALIMCO यांच्या संयुक्त विद्यमानाने आज चोपड्यात दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम हात व पाय बसविणे कलीपर्स याचे मोजमाप व तात्काळ वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेंच आदिवासी दिव्यांग बांधवांना खास करून पहिल्यांदा या शिबिराच्या फायदा घेतला, त्याचप्रमाणे या शिबिरात एकूण सत्तर ते ऐशी, दिव्यांग नी भाग घेतला, त्या पैकी 32 दिव्यांनाना साहित्य बसून वाटप केले, त्याचप्रमाणे आदिवासी भागात वेगवेगळे गावातून आठ दिव्यांग आले,
आणि त्यातून मेलाणे (डेडीयापाडा) या गावातील झगळ्या रिश्या पावरा हें जवळपास 90% दिव्यांग असेलेलं त्याला स्वतःच्या दैनिक जीवन जगण्यासाठी त्याला कृत्रिम रित्या पायाची आवश्यकता होती,परंतु त्याच्याकडे अपंग चा प्रमाणपत्र देखील नव्हतं, परंतु संबंधित पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांचा पाय बसविण्यास प्रमोद बारेला यांनी परिस्थिती सांगूनत्यांना विनंती केली. आणि संबंधित टीम ने निर्णय घेतला. आणि तसेच त्या दिव्यांगच्या जीवनात पहिल्यांदा चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. तसेच आदिवासी भागामध्ये दिव्यांग ना कृत्रिम हात पायापासून वंचीत आहे तरी अशाप्रकारे चें शिबिरे आदिवासी भागामध्ये आयोजन करावे.. तसेच उपस्थित डॉ. सुरेश पाटील जिल्हा वैद्यकीय अधिकारी,डॉ. विनोद पवार हे उपस्थित होते तसेच शिबिराच्या यशस्वीसाठी संघांचे स्वयंसेवक श्री.राजेंद्र स्वामी, श्री.नरेंद्र विसपुते, श्री. विजय पाटील,श्री.महेंद्र गुरव, श्री.संदीप शिंपी, श्री.विशाल एकडी, श्री प्रमोद बारेला उप सरपंच कर्जाणे यांनी अनमोल सहकार्य दिले. 32 दीव्यांग बांधवांना साहित्य देण्यात आले.
प्रतिक्रिया
आदिवासी भागांमध्ये दिव्यांग चे फारसेच प्रमाण असताना देखील त्यांच्याकडे दिव्यांग्याचे फार कमी प्रमाणपत्र आहेत, कारण असे शिबिर आयोजित करतात तेव्हा त्यांना असा लाभ घेण्यास अडचण निर्माण होते,म्हणून प्रत्येक गावातील दिव्यांगांना माझा आव्हान आहे की आपलं प्रमाणपत्र बनवून घ्या, तसेच माहिती नसल्यास मला संपर्क करा मी वैद्यकीय अधिकाऱ्यांना भेटून तुमचा प्रमाणपत्र बनविण्यास सहकार्य करेल,प्रमोद बारेला उप सरपंच कर्जाणे


No comments