महाराष्ट्र राज्यातील ३०५ कृषि उत्पन्न बाजार समिती पैकी स्मार्ट प्रकल्पा अंतर्गत चोपडा बाजार समितीचा २३ वा क्रमांक नाशिक विभागा मधुन ६ वा क...
महाराष्ट्र राज्यातील ३०५ कृषि उत्पन्न बाजार समिती पैकी स्मार्ट प्रकल्पा अंतर्गत चोपडा बाजार समितीचा २३ वा क्रमांक नाशिक विभागा मधुन ६ वा क्रमांक व जळगांव जिल्ह्यातुन २ रा क्रमांक आलेला आहे.
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जागतिक बँक अर्थसहाय्यित माननीय बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) स्मार्ट प्रकल्प राज्यामध्ये राबविण्यांत येत असतो या प्रकल्पा अंतर्गत सन २०२३-२०२४ क्रमवारीसाठी पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सुचित केल्यानुसार चोपडा बाजार समितीने शेतकरी व बाजार घटक यांचे करीता बाजार आवारात केलेल्या पायाभूत सुविधा, आर्थिक कामकाज, वैद्यानिक कामकाज व इतर निकष यांच्या आधारे पणन संचालक सो महाराष्ट्र राज्य पुणे यांना माहिती सादर केलेली होती त्यानुसार राज्यातील बाजार समित्याची वार्षिक क्रमवारी दिनांक २१/०४/२०२५ रोजी पणन संचालक सो, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कडून प्रसिध्द करण्यांत आलेली आहे.
चोपडा बाजार समितीचा राज्यस्तरावर ३०५ बाजार समित्या मधुन २३ वा क्रमाक आलेला असुन नाशिक विभागा मधुन ६ वा क्रमाक तर जळगांव जिल्ह्यात २ रा क्रमाक चोपडा बाजार समितीने पटकविला असुन शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी यांच्या सर्वाच्या सहकार्याने बाजार समितीने गुणवत्ता मिळवली आहे चोपडा बाजार समितीचे सभापती श्री. नरेंद्र वसंतराव पाटील, उपसभापती व सर्व संचालक मंडळ यांच्या कार्यकाळात बाजार समितीचा वाढलेला विस्तार, वाढलेली आवक, शेतकरी निवास, शेतकऱ्याना सेम डे पेमेन्ट, ईतर सुविधा व त्यांना देण्यांत येणारा न्याय, व्यापारी, हमाल, मापाडी व कर्मचारी यांची शेतकऱ्याप्रती सहकार्याची भावना, पारदर्शी कारभार बाजार समितीच्या यशाला पुरक ठरले आहे या निमित्ताने चोपडा बाजार समिती सभापती , उपसभापती व सन्मानिय संचालक मंडळ सह बाजार समितीचे सर्व कर्मचारी वृंद यांच्या सर्वाच्या सहकार्याने बाजार समितीने गुणवत्ता प्राप्त केली आहे.
( चोपडा तालुक्यातील कार्यसम्राट मा. आमदार प्रा. आण्णासो श्री. चंद्रकांत बळीराम सोनवणे व माजी आमदार ताईसौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांचे मोलाचे योगदान असुन यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असलेल्या बाजार समितीचे श्री. नरेंद्र वसंतराव पाटील सभापती, उपसभापती व सर्व संचालक मंडळाने बाजार समितीचा कारभार पारदर्शक व लोकाभिमुख केल्याने महाराष्ट्र राज्यातुन ३०५ बाजार समित्या मधुन २३ वा क्रमांक आलेला असुन नाशिक विभागातुन ६ वा क्रमांक आला आहे. तर जळगांव जिल्ह्यातुन २ रा क्रमांक चोपडा बाजार समितीने पटकविला आहे. तसेच यापुढे देखिल चोपडा बाजार समिती शेतकरी हितासाठी व प्रगतीसाठी प्रयत्नशिल राहील) मा.श्री. नरेंद्र वसंतराव पाटील सभापती, कृषि उत्पन्न बाजार समिती, चोपडा

No comments