नूतन मराठा महाविद्यालयात "जातीधर्मा पलिकडचे बाबासाहेब आंबेडकर" या विषयावर व्याख्यान संपन्न जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत ...
नूतन मराठा महाविद्यालयात "जातीधर्मा पलिकडचे बाबासाहेब आंबेडकर" या विषयावर व्याख्यान संपन्न
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या १३४ व्या जयंतीचे औचित्य साधून नूतन मराठा महाविद्यालयात, राष्ट्रीय सेवायोजन विभागाच्या वतीने "जातीधर्मा पलिकडचे बाबासाहेब आंबेडकर" या विषयावर श्री बाबुराव वाघ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल पी देशमुख अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर उपप्राचार्य डॉ के बी पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा संजय पाटील, राष्ट्रीय सेवायोजन अधिकारी डॉ पी बी पाटील विचारमंचावर उपस्थित होते..
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन, आलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात श्री बाबुराव वाघ यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक संघर्षापासून अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. डॉ बाबासाहेबांचे शेती आणि शेतकरी विषयक धोरण; मजूर आणि कामगार विषयक कायदे, महिलांच्या सबलीकरणासाठी हिंदू कोडबिल, सायमन कमिशन समोर आणि गोलमेज परिषदेत १८ वर्षांवरील सर्व स्री पुरुषांना मतदानाच्या अधिकाराची मागणी, सर्व जनतेला समानतेच्या तत्त्वावर स्वातंत्र्य अशा अनेक उदाहरणांवरून डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जातीधर्माच्या पलिकडे जाऊन सर्व भारतीयांसाठी लढणारा अनंत पैलुचा सामाजिक योद्धा होता असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल पी देशमुख यांनी देखील डॉ बाबासाहेबांना जातीधर्माच्या चष्म्यातून पाहणे योग्य नाही याचा पुनरुच्चार करत डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा झरा फक्त जयंती पुण्यतिथी पर्यंत सिमीत नसावा तो चिरंतन ठरावा यासाठी असे व्याख्यान झाली पाहिजेत असेही सांगितले.. सुत्रसंचलन प्रा ललिता हिंगोणेकर यांनी तर आभारप्रदर्शन डॉ राहुल संदानशिव यांनी केले..या प्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते..




No comments