कृष्णराज पाटील याची निवड लिटल चॅम्प प्रिमीयर लिग साठी निवड. भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव जिल्हा लिटल चॅम्...
कृष्णराज पाटील याची निवड लिटल चॅम्प प्रिमीयर लिग साठी निवड.
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्हा लिटल चॅम्प प्रिमीयर लिग (Lcpl ) यांनी जिल्ह्यातील क्रिकेट खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड चाचणी रविवार दि.१३ रोजी धनाजी नाना महाविदयालय फैजपूर येथे घेतली या निवड चाचणीत उंटावद येथील पत्रकार महेश(भैय्यासाहेब )भागवत पाटील यांचे चि.कृष्णराज महेश पाटील याची १४ वर्षा आतील क्रिकेट संघात व्हिकेटकिपर बॅटसमन म्हणून निवड झाली चि.कृष्णराज पाटील हा इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूल किनगाव या शाळेचा विद्यार्थी आहे.निवड झालेल्या सर्व खेळाडुंचे सराव प्रशिक्षण मंगळवारपासून सुरू होणार असून पहिली क्वालिफाय टूर्नामेंट अमरावतीला तर दुसरी क्वालिफाय टूर्नामेंट जळगाव येथे होणार आहे या टुर्नामेंट मध्ये जे खेळाडू चांगले प्रदर्शन करतील त्यांना एलसीपीएल च्या बोली प्रक्रियेत प्रवेश करण्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत चि.कृष्णराज पाटील हा यावल तालुका पत्रकार क्रिकेटर संघात नियमित सराव करीत असल्याने त्याला हे यश मिळाले चि.कृष्णराज पाटील याची निवड झाल्या बद्दल यावल तालुका पत्रकार क्रिकेट संघाचे कर्णधार शेखर पटेल,भरत कोळी,सुनिल गावडे (पाटील),सुधीर चौधरीसर,तेजस यावाकर,रणजीन भालेराव,हर्षल अंबेकर,योगेश सोनवणे,सलीम पिंजारी,ज्ञानदेव मराठे इ. सह तालुक्यातील सर्व पत्रकारांनी कौतुक करत पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments