adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर येथे अवैद्य कत्तलखाना उध्वस्त तीन जणांना अटक

  फैजपूर येथे अवैद्य कत्तलखाना उध्वस्त तीन जणांना अटक  इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड ) फैजपूर येथील अवैद्य कत्तलखाना सहाय्य...

 फैजपूर येथे अवैद्य कत्तलखाना उध्वस्त तीन जणांना अटक 

इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथील अवैद्य कत्तलखाना सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे व त्यांच्या पथकाने नेस्तनाबूत केला आहे फैजपूर येथील मिल्लत नगर मस्जिद जवळ शेख नईम उर्फ नम्मा अब्दुल रहीम कुरेशी यांच्या घराच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये अवैद्य कत्तलखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांना समजली होती धडाडीचे पोलीस अधिकारी रामेश्वर मोताळे यांनी लागलीच आपल्या पथकाच्या मदतीने त्या ठिकाणी सापळा रचून पंचाच्या मदतीने खात्री करून कायदेशीर कारवाई केली घटनास्थळी इकराम शेख नईम कुरेशी वसीम शेख अब्दुल रहीम कुरेशी आणि शेख मुस्तकीम शेख कलीम हे तिघेजण आढळून आले तसेच या ठिकाणी त्यांच्या कब्जा 220 किलो वजनाचे गोवंश मासाचे तुकडे सुमारे 23 किलो वजनाचे बैलाचे कातडे तराजू काटा वजन मापे मास कापण्यासाठी लागणारी लोखंडी सुरी व एक लाल रंगाचा जिवंत गोवंश जातीचा गोरा असा मुद्देमाल आढळून आला तातडीने या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र काशिनाथ मोरे यांनी सरकारतर्फे फिर्यादी होत फैजपूर पोलीस स्टेशनला रीतसर फिर्याद दाखल केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद गाभणे करत आहे

No comments