adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मा. मुख्यमंत्री महोदयांच्या १०० दिवसाच्या कृती आराखडयातील ७ कलमी उपक्रमा अंतर्गत दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा..... मा. आयुक्त प्रशासक वसई विरार महानगर पालिका

 मा. मुख्यमंत्री महोदयांच्या १०० दिवसाच्या कृती आराखडयातील ७ कलमी उपक्रमा अंतर्गत दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा..... मा. आयुक्त प्रशासक वसई ...

 मा. मुख्यमंत्री महोदयांच्या १०० दिवसाच्या कृती आराखडयातील ७ कलमी उपक्रमा अंतर्गत दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा..... मा. आयुक्त प्रशासक वसई विरार महानगर पालिका 


वसई:- प्रतिनिधी मनीषा जाधव

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

  मा. मुख्यमंत्री महोदयांच्या १०० दिवसाच्या कृती आराखडयातील ७ कलमी उपक्रमा अंतर्गत वसई-विरार क्षेत्रातील दिव्यांग नागरिकांना महापालिकेमार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ ऑनलाईन पद्धतीने मिळणेकरीता सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तरी या ऑनलाईन सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेऊन महानगरपालिकेच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत महानगरपालिका हद्यीतील दिव्यांगकरिता खालीलप्रमाणे विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे.१) ४० % ते ५९% अपंगत्व असलेल्या अंध, अस्थिव्यंग, बहुविकलांग, कर्णबधिर-मुकबधीर दिव्यांग व्यक्तींना मासिक रु.१०००/- अनुदान देणे.२) ६० % ते ७९ % अपंगत्व असलेल्या अंध, अस्थिव्यंग, बहुविकलांग, कर्णबधिर-मुकबधीर दिव्यांग व्यक्तींना मासिक रु.१५००/- अनुदान देणे.३) ८० % ते १०० % अपंगत्व असलेल्या अंध, अस्थिव्यंग, बहुविकलांग, कर्णबधिर-मुकबधीर दिव्यांग व्यक्तींना मासिक रु.२०००/- अनुदान देणे.४) जेष्ठ ६० वर्षावरील दिव्यागांना कायमस्वरुपी प्रोत्साहनात्मक प्रतीमाह रु. २०००/- अनुदान देणे.५) दिव्यागांना स्वयंरोजगारा करिता व्यवसायानुसार रु.५०,०००/- पर्यंत आधार योजना राबविणे.६) दिव्यांग करिता १८ वर्षावरील गतीमंद व मतीमंद व्यक्तीच्या संगोपनाकरिता त्यांच्या कुटूंबाला प्रतीमाह रु. २०००/- अनुदान देणे.७) दिव्यांग खेळाडूंसाठी तालुकास्तरीय रु.१०,०००/-, जिल्हास्तरीय रु. २५,०००/-, राज्यस्तरीय रु.५०,०००/-,आंतरराष्ट्रीय स्तरीय रु.१,००,००/- इतके प्रोत्साहनात्मक अनुदान देणे.८) दिव्यांग व्यक्तींना व्याधीग्रस्त आजार, शस्त्रक्रिया त्या अनुषंगीक आजारानुसार खर्चाच्या २५% अर्थसहाय्य उपलब्ध करुन देणे.या सर्व योजनांची महानगरपालिकेच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत दैनंदिन अंमलबजावणी सुरू असून, याबाबतचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://vvcmc.in/schemes-2/ या संकेतस्थळावर भेट द्यावे. तसेच खालील दिलेल्या QR code वर स्कॅन करुन देखील अर्ज करु शकता, तरी सदर योजनेकरिता पात्र महानगरपालिका हद्यीतील लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन मा. आयुक्त तथा प्रशासक यांनी केले.

No comments