adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

" मराठी विरुद्ध हिंदी वातावरण महाराष्ट्राची बदनामी करणारे, पाचवी पासून हिंदी अनिवार्य आहेच पहिलीपासून अट्टाहास का?आठवीतील ३५%मुलांना धड मराठी वाचता येत नाही, त्यामुळे हा निर्णय थांबवावा एस बी पाटील यांची मुख्यमंत्र्यांना विनंती....

 " मराठी विरुद्ध हिंदी वातावरण महाराष्ट्राची बदनामी करणारे, पाचवी पासून हिंदी अनिवार्य आहेच पहिलीपासून अट्टाहास का? आठवीतील ३५%मुलांना ...

 " मराठी विरुद्ध हिंदी वातावरण महाराष्ट्राची बदनामी करणारे, पाचवी पासून हिंदी अनिवार्य आहेच पहिलीपासून अट्टाहास का?

आठवीतील ३५%मुलांना धड मराठी वाचता येत नाही, त्यामुळे हा निर्णय थांबवावा एस बी पाटील यांची मुख्यमंत्र्यांना विनंती....


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

.......पहिली पासून हिंदी हा विषय अनिवार्य केल्याने महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी असे राजकारण सुरू झाल्याचे चित्र निर्माण झालं आहे.तर देशभर महाराष्ट्राविषयी बदनामी होईल होत आहे,जे देशाच्या एकात्मतेच्या विरोधात आहे.

      _महाराष्ट्रात याआधीच पाचवीपासून हिंदी हा विषय अनिवार्य आहेच व पाचवीपासून हिंदी भाषा शिकल्याने कोणत्याही विद्यार्थ्यांचे काहीही नुकसान होत नव्हते व राष्ट्रीय भाषेचा मान देखील राखला जात होता, मग आता असे काय घडले की पहिलीपासूनच हिंदी शिकली पाहिजे._ 

  आज महाराष्ट्रातील पालक पहिली पासून हिंदी चे अनिवार्य निर्णयाने चिंतीत यासाठी आहेत की महाराष्ट्रातील मूल आधीच सी बी एस सी किंवा आय सी एस सी च्या मुलांच्या तोडीने मागे आहेत,म्हणून आपल्याच सरकारने महाराष्ट्रात सी बी एस सी चे धर्तीवर  अभ्यासक्रम करण्याचे नियोजन केलं आहे त्याचे साऱ्यांनी कौतुक देखील केले होते.याने लहान मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी होणे ऐवजी वाढणार असून हिंदी हा विषय अनिवार्य केल्याने मुलांच्या पाठीवरिल ओझे तर वाढेल शिवाय अधिकचा ताण पडेल असे देखील पत्रात नमूद केले आहे.

  _महाराष्ट्रातील आठवीतील पस्तीस टक्के मुलांना मराठी लिहिता वाचता येत नाही असे चित्र असताना त्यात आणखी आता हिंदीची भर या अट्टाहासाने ग्रामीण भागातील शिक्षणाची वाईट अवस्था होईल अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे. 

  इंग्रजी भाषा अनिवार्य करताना किंवा तिचा समावेश करताना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या मुलांना टिकता यावे व तेथे रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात हा सर्वमान्य समज आहे त्यामुळे इंग्रजी विषयी प्रेम आहे असे म्हणण्यापेक्षा इंग्रजी ची गरज ही पालकांना जास्त वाटते._ 

   देशाचे पंतप्रधान हे गुजरात या राज्याचे असताना तेथे पहिलीपासून हिंदी अनिवार्य नाही, मग हा प्रयोग महाराष्ट्रातच का? या आधी देखील शिक्षण क्षेत्रात जे जे प्रयोग झालेत ते महाराष्ट्रातच आता ते नकोत अशी देखील पत्रात केली आहे.वरिष्ठ पातळीवर चर्चा करून सध्या हा निर्णय प्रलंबित ठेवून पूर्ण चर्चा करून विद्यार्थ्यांच्या पाठीवर ओझे वाढणार नाही व त्यांना जागतिक दर्जाला टिकतील असे सर्व समावेशक शिक्षण मिळेल असा अभ्यासक्रम तयार करून आपले राज्यावरील प्रेम सिद्ध करावे अशी अपेक्षा देखील पत्रात व्यक्त केली आहे.

No comments