खडसे महाविद्यालयात पीएम-उषा अंतर्गत भूगोल विभागात प्रमाणपत्र अभ्यासक्रम संपन्न मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:- हेमकांत गायक...
खडसे महाविद्यालयात पीएम-उषा अंतर्गत भूगोल विभागात प्रमाणपत्र अभ्यासक्रम संपन्न
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयात पीएम-उषा अंतर्गत भूगोल विभागात Land Measurement by using GPS हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम संपन्न झाला. या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयातील 30 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला होता. या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या लेखी व प्रात्यक्षिक तासिका प्रा. डॉ. प्रसन्नकुमार देशमुख भूगोल विभाग संत मुक्ताबाई महाविद्यालय, मुक्ताईनगर यांनी साधन व्यक्ती म्हणून पूर्ण केल्या. या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे समन्वयक म्हणून प्राध्यापक एस. एन.पाटील यांनी कार्य केले. New techniques in Geo-spatial म्हणजेच आधुनिक सर्वेक्षण पद्धती तसेच जीआयएस, जीपीएस व रिमोट सेन्सिंग याबद्दलची सविस्तर माहिती दिली. या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थी रोजगार भिमुख निर्माण होईल अशी आशा महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत महाजन यांनी व्यक्त केली. तसेच पीएम-उषाचे समन्वयक तथा महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी पूरक सूचना केल्या त्याचबरोबर पीएम उषाचे सहसमन्वयक प्रा. डॉ. अतुल वाकोडे यांनी प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी सहकार्य केले. याचबरोबर भूगोल विभागातील प्रा. राजन खेडकर व प्रा. विजय डांगे व प्रा. डॉ.अतुल बढे यांनी प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे नियोजन केले. तसेच प्रा. पी. पी. लढे यांनी मार्गदर्शन केले.

No comments