फैजपूर येथे फिरते विधी सेवा केंद्र आणि लोक अदालतीचे आयोजन भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल तालुका प्रतिनिधी ...
फैजपूर येथे फिरते विधी सेवा केंद्र आणि लोक अदालतीचे आयोजन
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल तालुका प्रतिनिधी दि. 10 एप्रिल रोजी माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यावल तालुक्यातील फैजपूर येथे फिरते विधी सेवा केंद्र तथा लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे नियोजन प्रथम वर्ग न्यायाधीश तथा यावल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष श्री. आर. एस. जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार फैजपूर पोलीस स्टेशन परिसरात करण्यात आले. हा कार्यक्रम विधी सेवा समिती तसेच यावल वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आला. यावेळी विविध कायदेविषयक विषयांवर मार्गदर्शन देखील करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.आर.एस. जगताप हे होते. तर कार्यक्रमाचे उद्घाटन यावल वकील संघाचे जेष्ठ विधीज्ञ नितीन चौधरी यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ विधीज्ञ अशोक सुरळकर यांनी केले. याप्रसंगी एडवोकेट खालिद शेख यांनी लोक अदालतीचे महत्त्व सांगून या माध्यमातून आपला वेळ, पैसा आणि होणारा मानसिक ताण कसा कमी करता येऊ शकतो हे स्पष्ट केले. समांतर विधी सहाय्यक शशिकांत वारूळकर यांनी विधी सेवा कायदा 1987 बद्दल माहिती देऊन आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे उद्घाटक तसेच वकील संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ नितीन चौधरी यांनी आपापसातील तंटे समोपचाराने सोडवण्यासाठी आव्हान केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा यावल न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश श्री.आर. एस. जगताप साहेब यांनी वैकल्पिक वाद निवारण कायदा तसेच संविधानाने नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्यांची जाणीव यावेळी करून दिली. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आपण थांबवला पाहिजे. पर्यावरण वाचले तरच मानवी जीवन वाचेल, शिवाय जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, हे सुद्धा आपले एक राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे त्यांनी आपल्या भाषणातून विशद केले. उपस्थितांचे आभार फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर मोताळे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी यावल वकील संघाचे ज्येष्ठ विधीज्ञ गोविंदा बारी, धीरज चौधरी, आकाश चौधरी, रियाज पटेल, भूषण महाजन तसेच नितीन कोळी हे होते. तसेच फैजपूर पोलीस स्टेशनचे पीएसआय सय्यद मैनुद्दीन हबीब, यावल पोलीस स्टेशनचे पीएसआय सुनील भास्कर मोरे, पोलीस कर्मचारी रवींद्र मोरे, सुशीला भिलाला, रशीद तडवी, ज्ञानेश्वर चौधरी, अमजद पठाण याच प्रमाणे यावल न्यायालयीन कर्मचारी संजीव तडवी, समीर झांबरे, भूषण बागुले, आकाश पाटील, शिपाई अविनाश पोफडे तसेच समांतर विधी सहाय्यक अजय बढे आदी सह अनेक नागरिक उपस्थित होते.

No comments