Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूरच्या शिव कॉलनी भागात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई नगरपालिकेला दिला उपोषणाचा इशारा

  फैजपूरच्या शिव कॉलनी भागात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई नगरपालिकेला दिला उपोषणाचा इशारा  इदू पिंजारी फैजपूर (संपादक हेमकांत गायकवाड) फैज...

 फैजपूरच्या शिव कॉलनी भागात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई नगरपालिकेला दिला उपोषणाचा इशारा 


इदू पिंजारी फैजपूर

(संपादक हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथील शिव कॉलनी भागात बऱ्याच महिन्यापासून भीषण पाण्याची टंचाई भासत असून समस्या दूर न झाल्यास महिना अखेर कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने उपोषण करण्यास येईल असा इशारा वरील शिव कॉलनी भागातील रहिवासीनी आज दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी नगरपालिकेच्या सहाय्यक कार्यलयीन अधीक्षक संगीता बाक्षे यांना दिले आहेत

        निवेदनात म्हटले आहे की शिव कॉलनी भागात गट क्रमांक ९४१ ते ९४२ पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे बऱ्याच वेळा नगरपालिकेला याबाबत तोंडी लेखी तक्रारी केल्यावर त्यावेळी संबंधित अधिकारी म्हणजे आम्ही येतो बघतो अशी उत्तरे देऊन वेळ मारून सांगतात मात्र ठोस कार्यवाही होत नाही सन २००८ व २००९ मध्ये सदर आमची वस्ती शासनाने दलित वस्ती म्हणून घोषित केली आहे फक्त त्यावेळेस दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत गार्डनचे बांधकाम करण्यात आले आहे तेव्हापासून या वस्तीमध्ये कोणताही प्रकारचा दलित वस्ती सुधारण्याच्या निधीचा वापर झालेला नाही व सुधारणा झालेली नाही तरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत वर नमूद भागात म्हणजेच देविदास साळुंखे यांचे घरापासून ते दिलीप आढावे यांचे घरापर्यंत आणि तेथून सुनील नाथजोगी यांचे घरापासून ते रावते गुरुजी यांचे घराजवळील असलेल्या पाईपलाईन पर्यंत ४ इंची नवीन पाईप टाकून जोडणी करून पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न सोडवावा असे सह्याचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते अशोक भालेराव सामाजिक कार्यकर्त्या लताबाई सदानंद मेढे सुनील नाथ जोगी दिलीप रावते सोनाली चावरे सुरेखा सपकाळे राजेश नाथजोगी विकी घावरे अशोक कोळी बाळू भालेराव शंकर पाटील संस्कृती तायडे मनोहर कोल्हे यांच्यासह नागरिकांनी दिले आहे.

No comments