सावखेडा गावाची लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करत दुष्काळसदृश परिस्थितीवर मात बक्षिसाच्या ५० लाखांत सिमेंटची 5बंधारे बांधली २६० खोल भूजल ...
सावखेडा गावाची लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करत दुष्काळसदृश परिस्थितीवर मात
बक्षिसाच्या ५० लाखांत सिमेंटची 5बंधारे बांधली २६० खोल भूजल पातळी ८० फुटांवर आणली
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
संपादक हेमकांत गायकवाड
रावेर तालुक्यातील सावखेडा गावकऱ्यांनी गावात जलसंधारणाची कामे हाती घेत ती पुर्णत्वास नेऊन सावखेडा गावाने लोकसहभागातून दुष्काळसदृश पाणी टंचाई सदृश्य परिस्थितीवर मात केली. गाळ साचून पाणी साठा क्षमता कमी झालेल्या सिमेंट बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे कार्य हाती घेतले व गाळ मुक्त बंधारे करीत भुगर्भातील तब्बल २६० फुटांपर्यंत खोलवर गेलेली भूजल पातळी लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करून तब्बल ८० फुटांवर आणली.रावेर तालुक्यातील सावखेडा या गावाच्या प्रशंसनीय कामगिरीची दखल घेत शासनाने सन २०२२-२३ मध्ये अटल भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत जिल्हास्तरावरील तब्बल ५० लाखांचे पहीले बक्षीस दिले. गावांसाठी मिळालेल्या या बक्षिसाचे रकमेतून सावखेडा गावात यंदा पुन्हा नवीन पाच सिमेंटचे बंधारे बांधले.
सावखेडा हे गांव खिरोदा (ता.रावेर) या गावापासून तीन किमी अंतरावर आहे. पाण्याचा अति उपसा झाल्याने हे गाव अतिशोषित प्रकारात येते. गावाने भूजल समृद्ध गाव स्पर्धेत सहभाग घेतला तेव्हाची भूजल पातळी २६० फूट खोल होती. हे चित्र बदलण्यासाठी संपूर्ण गाव एकवटले. भूजल सर्वेक्षणच्या मार्गदर्शनाखाली मृतावस्थेत असलेल्या सिमेंट बंधाऱ्यातील गाळ लोकसहभागातून काढला. त्यांची साठवण क्षमता वाढली. 3400लोकसंख्या असलेल्या 80%साक्षर सुशिक्षित सावखेडा गावात घरोघरी शोषखड्डे, गावातील शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी आणि घरांवरील छताचे पावसाळ्यातील पाऊस पाणी रेन हार्वेस्टिंग द्वारे नेले जमीनीत शोषखड्डे केले. गावाच्या चहूबाजूने तीन हजार झाडांची लागवड करत ती जगवली.यासोबतच जलसंधारणाचीही कामे करण्यात आली.
गावापासून ६ किमी अंतरात टप्प्याटप्याने सिमेंटचे २८ बंधारे बांधले भूगर्भातून अतीभूजल उपशामुळे सावखेडा गाव अतिशोषित प्रकारात येते. त्यामुळे सर्वाधिक आव्हान भूजल पातळी वाढवण्याचे होते. त्यासाठी गावापासून ५०० मीटर ते ६ किमी अंतरात टप्याटप्याने २३ आणि गायरान भागात धाडी नदीवर ३ असे असे एकूण २८ बंधारे बंधारे बांधण्यात आले. काही ठिकाणी विहिरींचे पुनर्भरण केले. यामुळे भूजल पातळी २६० वरून ८० फुटांवर आली. रावेर तालुक्यातील सावखेडा गाव रावेर तहसील मध्ये समाविष्ट आहे रावेर तहसील पंचायत समिती मुख्यालयापासून १४ किलोमीटर अंतरावर आहे विशेष सावखेडा गावाची पहिलीच जिल्हा परिषद शाळा आयएसओ प्रमाणित आहे

No comments