adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्वच्छता मूल्यांकन समितीची थेपडे म्हसावद विद्यालयाला भेट

  स्वच्छता मूल्यांकन समितीची थेपडे म्हसावद विद्यालयाला भेट  जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील (संपादक -:- हेमकांत गायकवाड)       जळगाव ता...

 स्वच्छता मूल्यांकन समितीची थेपडे म्हसावद विद्यालयाला भेट 


जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

      जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील स्वातंत्र्य सैनिक पं.ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला "गांधी तीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगिता २०२४ अंतर्गत स्वच्छता मूल्यांकन समितीने आज भेट दिली. गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव  आयोजित  "गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता २०२४ च्या अंतिम  मूल्यांकन साठी  स्वातंत्र्य सैनिक पं. ध .थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, म्हसावद तालुका जिल्हा जळगाव येथे दिनांक १ एप्रिल २०२५ रोजी अंतिम स्वच्छता मूल्यांकनासाठी आदरणीय गिरीशदादा कुलकर्णी सर,  सी डी पाटील सर यांनी  विद्यालयात भेट देऊन शाळा आणि परिसर स्वच्छतेचे सर्वेक्षण केले. सदर प्रसंगी शाळेच्या विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने आदरणीय गिरीश दादा कुलकर्णी आणि सी.डी. पाटील सर यांचे स्वागत केले. भेटी प्रसंगी अंतिम स्वच्छता मूल्यांकन  परीक्षण अहवाल, नोंदणी अहवाल, शाळेत राबवलेले स्वच्छता विषयक विविध उपक्रमाविषयीचे बारकावे ,उपक्रमातील सहभागी विद्यार्थी, शिक्षक तसेच उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल याविषयीची चर्चा समिती ने केली. मुलांमध्ये स्वच्छतेचे मूल्य तसेच स्वच्छतेचे संस्कार रुजवणे काळाची गरज आहे .तसेच आजचा विद्यार्थी हा उद्याच्या भारताचा भावी आधारस्तंभ आहे . विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता आणि पर्यावरणविषयीची गोडी निर्माण होणे गरजेचे आहे .म्हणूनच अशा स्पर्धा आयोजित केल्या जातात असे  आदरणीय गिरीशदादा कुलकर्णी सरांनी आपल्या मनोगतात मार्गदर्शन केले. सदर प्रसंगी विचार मंचावर विद्यार्थ्यांनी स्वच्छता विषयक पथनाट्याचे सादरीकरण केले. आदरणीय गिरीश दादा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक पी डी चौधरी सर यांनी आदरणीय गिरीश दादा आणि सी डी पाटील सर यांचे स्वागत/सत्कार केला.विद्यालयातील शिक्षिका भगिनींनी औक्षण करून गिरीश दादा आणि सीडी पाटील सरांना शुभेच्छा दिल्या. विचारवंसावर मुख्याध्यापक पी डी चौधरी,उपमुख्याध्यापक  बच्छाव सर, पर्यवेक्षक के पी पाटील सर तसेच ज्येष्ठ शिक्षक आणि शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते.

No comments