adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रावेर शहर अध्यक्ष पदी शेख हमीद शेख रफीक यांची नियुक्ती

  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रावेर शहर अध्यक्ष पदी शेख हमीद शेख रफीक यांची नियुक्ती  रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- हेमकांत गायक...

 महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रावेर शहर अध्यक्ष पदी शेख हमीद शेख रफीक यांची नियुक्ती 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर येथील रहिवासी शेख हमीद शेख रफीक यांची रावेर शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.पत्रकार संघाचे संघटन ध्येयधोरणे सभासद वाढवणे व संघातर्फे समाजोपयोगी उपक्रम राबवण्या संदर्भात चर्चा करण्यात आली .पत्रकार हा केवळ पत्रकार म्हणूनच कार्य करत नाही तर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळवून देण्याचा सतत प्रयत्न करत असतो.यावेळी पत्रकारावर होणारे अन्याय त्याचप्रमाणे समाजात होणारे अनुचित कार्य यास लगाम घालण्याचे कार्य करतो त्या अनुषंगाने रावेर तालुक्यात नव्याने स्थापन झालेल्या म.राज्य पत्रकार संघातर्फे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचे कार्य तसेच शेतकरी, शेतमजूर, नोकरदार या सर्वासाठी मार्गदर्शक ठरेल यानुसार पत्रकार संघाचे कार्य करावे व समाजात एक आदर्श निर्माण करावा . नुतन कार्यकारिणीत शेख हमीद शेख रफीक यांची रावेर शहर अध्यक्ष पदी यांची नियुक्ती करण्यात आली तालुका अध्यक्ष विजय अवसरमल यांनी त्यांना नियुक्ती देण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले. 

यावेळी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र संघटक विनोद  कोळी (शिवा भाई ), म.राज्य पत्रकार संघ रावेर तालुका अध्यक्ष विजय अवसरमल, कार्याध्यक्ष विनायक जहुरे, रावेर तालुका सरचिटणीस शेख शरीफ,जळगाव ग्रामीण जिल्हा सरचिटणीस सुरेश पवार,रावेर शहर अध्यक्ष शेख हमीद शेख रफीक,रावेर शहर कार्याध्यक्ष चंद्रकांत वैदकर,विजय काशीनाथ अवसरमल,प्रविण पाटील,श्रीराम गंवळी,राहत खाटीक आदी उपस्थित होते.पत्रकार बांधव यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments