सांगवी बुll येथे वारकरी भजन प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) - चांगले कार्य करणारी माणसं समा...
सांगवी बुll येथे वारकरी भजन प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
- चांगले कार्य करणारी माणसं समाजाच्या नेहमी लक्षात राहतात . पूर्वीच्या काळी ज्यांनी समाजाला भगवत भक्तीचा आणि संत सेवेचा उपदेश केला आजही ती लोक शतक उलटलं तरी लोकांच्या कायम लक्षात आहे असे प्रतिपादन भालचंद्र भंगाळे यांनी केले . सांगवी बुद्रुक येथे ज्योती विद्यामंदिर या ठिकाणी आयोजित वारकरी भजन प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक पराग बुवा चोपडे यांनी केले .प्रास्ताविकातून त्यांनी शिबिराच्या आयोजना पाठीमागचे उद्दिष्ट आणि दैनंदिन रूपरेषेची ओळख दिली . शिबिराच्या पहिल्या दिवशी सुमारे 50 विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करण्यात आलेली आहे . शिबिरात मुलांना प्राणायाम, योगासने, भागवत गीता श्लोक पाठांतरण, टाळ, मृदंग तसेच वारकरी चाली व पावल्या यांचे मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सांगितले. शिवाय दुपारच्या सत्रात महापुरुषांचे जीवन चरित्र व्याख्यानमाला प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सूत्रसंचालन दीपक बुवा पाटील शेळगावकर यांनी केले . प्रसंगी उद्धव बुवा ,गोपाळ बुवा तसेच विकास धांडे ,अतुल फिरके, कमलाकर चौधरी, हरिश अत्तरदे, पंकज भंगाळे व पालक वर्ग उपस्थित होता.शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रकाश मंडळ सांगवी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे .
No comments